पोषक आहार आणि व्यायाम यावर आपले आरोग्य अवलंबून असते. त्यासाठी निरोगी रहायचे असेल तर दैनंदिन आहारात पौष्टीक अन्न आणि व्यायाम खूप गरजेचा आहे. आजकाल हायब्रीड खाण्यामुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि रोग होऊ लागले आहेत. शुगर, हार्ट अटॅक, बीपी यांसारख्या आजारांना लोक बळी पडत आहेत.यासर्व समस्यांपासून लांब रहायचे असेल तर व्यायाम आणि आहार हा योग्यच असला पाहिजे. आपल्या दैनंदिन आहारात पालेभाज्यांचा समावेश असणे खूप गरजेचे आहे.
आपला आहार योग्य असला पाहिजे:
कारण हिरव्या पालेभाज्या मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे असतात ती आपल्या शरीरास खूप पोषक आणि आवश्यक असतात. आज या लेखात आणि पोषक तत्वांची खाण असलेली आणि डायबिटीस च्या रुग्णांसाठी संजीविनी असलेल्या भाजीविषयी माहिती सांगणार आहोत.मेथी मध्ये भरपूर प्रमाणात लोह असतात. तसेच मेथी आणि मेथी दाणे याचा उपयोग औषध म्हणून ही केला जातो. तसेच सौदी अरेबिया मधील एका विद्यापीठाने मेथी वर संशोधन केले आहे त्यातून असे समजले आहे की मेथी ही डायबेटीस च्या रुग्णांसाठी जिवन संजीवनी आहे.सुरवातीच्या काळात मेथीच्या पानाचा आणि दाण्याचा उपयोग हा पोट किंवा पाठदुखी कमी करण्यासाठी केला जात होता.
मेथीचे औषधी महत्व:-
मेथी आणि मेथीच्या दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात तसेच मेथीमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. मेथीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून सुद्धा केला जातो.मेथी मध्ये अँटीडायबिटीक, अँटीकॅन्सर, अँटीमाइक्रोबियल, अँटीइंफर्टिलिटी, अँटीपॅरासिटिक लॅक्टेशन उत्तेजक आणि हायपोकोलस्ट्रॉलेमिक यासाठी जालीम आणि उपयुक्त आहे.
मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर:-
लोकांना मधूमेह मध्ये टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह असे 2 मधुमेहाचे प्रकारचे आढळतात. तसेच मधुमेहाला सायलंट किलर असे सुद्धा म्हटले जाते. मेथी मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेही इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांना रोजच्या आहारात 100 ग्रॅम मेथीदाण्यांची पावडर मिसळल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल, एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड कमी होण्यास मदत मिळते. आणि डायबिटीस चा त्रास कमी होण्यास मदत होते.
Share your comments