उन्हाळा आला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळा सुरू झाल्यावर अनेकांना उष्णतेचा खूप त्रास होतो. शरीराला सारखी पाण्याची गरज असते.
उन्हाळ्यात आपल्यावा शारीरिक उर्जा जास्त लागते. त्यामुळे पौष्टीक आणि पूरक आहाराचा समावेश करा. तसेच उन्हाळ्यात बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे.उन्हाळ्यात अनेक लोकांना भरपूर पाणी प्यावे वाटते. काहीजण दोन ते तिन लीटर पाणी पितात. उन्हाळ्यात घाम येतो. तसेच व्यायाम केल्यानेही पाण्याची गरज आणि प्रमाण वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.
पाणी भरपूर प्या
उन्हाळ्यात भरपुर पाणी पिणे गरजेचे असते.भरपूर म्हणजे फक्त पाणी पितचं राहणे नव्हे तर जेव्हा-जेव्हा तहान लागेल तेव्हा टाळाटाळ न करता पाणी पिणे.
शक्यतो फ्रिजमधील पाणी पिणे टाळावे.
जिरे पाणी
आपल्या स्वंयपाक घरातील महत्वाच्या मसाल्यापैकी एक म्हणजे जिरे.या जिऱ्याचे विविध पदार्थात आपण वापर करतो. त्याचबरोबर आणि जिरे विविध आजारावर सुध्दा परिमाणकारक असतात. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की जिरे पाणी प्या.रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजत ठेवावे आणि सकाळी ते जिरे पाणी सेवन करावे.उष्णता पण कमी होतेच आणि वजनदेखील नियंत्रणात राहते.
सब्जा उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना उष्णतेचा त्रास होत असतो.
सब्जाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा थोडं मोठ्या आकाराचे व करड्या रंगाचे असते.सब्जा पाण्यात घातल्यावर फुगते. हे सब्जाचे पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी करते.तुम्ही सब्जाचे बी पाणी दुधातून किंवा सरबतातून घेतल्यास उष्णतेचे विकार लवकर बरे होतात.
कोकम सरबत
कोकम सरबतही उष्णतेवर गुणकारी आहे.कोकम पाण्यात किमान अर्धा तास भिजत ठेवा.
यात साखर, चवीपुरते काळे मीठ आणि जिरेपुड टाकुन एकजीव करून घ्या आणि सेवन करुन घ्या
ताक
ताक पिणे हा एक पर्याय आहे जो उष्णता कमी करते.उष्णतेमुळे थकल्यासारखे वाटतं असेल तर ताकाने एनर्जी येते.पण हे ताक कधी प्यावे हेही आपल्याला माहीत असावे. रोज दुपारी ताक प्यावे.रात्रीचे ताक शक्यतो पिऊ नये.
टीप – कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य.
Share your comments