1. आरोग्य सल्ला

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

आजकाल च्या युगात लोकांना वेगवेगळे रोग आणि आजार जडत आहेत. याची अनेक वेगवेगळी कारण आहेत परंतु या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे पोषक आहार आणि व्यायाम. या दोन्ही गोष्टींचा अवलंब केल्यास आपण निरोगी राहू शकतो. पोषक आहाराचा समावेश आपल्या आहारात केल्यास आपल्या शरीरातील रक्ताचे आणि हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. आजच्या युगात बहुतांशी लोक उच्च कोलेस्ट्रॉल मुळे त्रस्त झाले आहेत. यावर अनेक लोक उपचार सुद्धा शोधतात परंतु जर या आपण आहारात या पदार्थांचा वापर केला तर आपल्या शरीरातील रक्ताचे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

किरण भेकणे
किरण भेकणे
soyabean

कोलेस्ट्रॉल आणि हृद्यविकारापासून वाचायचे असेल तर आहारात काही निरोगी गोष्टी चा समावेश करणे खूप गरजेचे आहे. या मध्ये भाज्या, फळे, कडधान्य, अखरोट तसेच काही वनस्पती-आधारित पदार्थ खाल्ल्याने आपल्याला पोषक, हृदय-हेल्दी फॅट आणि फायबर मिळू शकते. हे सर्व हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाययोजना:-

1)अक्रोड:- अक्रोड मध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी असते त्यामुळे दिवसात तुम्ही 2 अक्रोड खाल्ले तरी तुमच्या शरीरात मुबलक ऊर्जा निर्माण होते. अक्रोड मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा – 3, फायबर, कॉपर आणि फॉस्फोरससारखे अनेक पोषक तत्व आढळतात जे की आपल्या शरीराला खूप फायदेमंद असतात. अक्रोड चे सेवन केल्यास शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये
साठलेले कोलेस्ट्रॉल वितळते आणि कोलेस्ट्रॉल चा त्रास कमी होतो.

2)लसूण:- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर लसूण आहे. त्यामुळे लसणाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. लसणामध्ये अशी काही एंजाईम्स आढळतात जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 2 लसणाच्या पाकळ्या तरी खाव्यात.

3)सोयाबीन:- सोयाबीन्स, डाळ आणि मोड आलेले कडधान्य हे रक्तातील असणारे एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी लिव्हरची खूप मदत करतात. त्यामुळे आहारात सोयाबीन चे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते आहे.

4)लिंबू:-लिंबू ही एक आंबट फळ आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चा मोठा साठा आढळतो तो आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आणि फायदेशीर ठरतो. तसेच लिंबामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात जे की आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करत असतात.

English Summary: Include these foods in your diet to lower cholesterol in the body Published on: 11 March 2022, 01:19 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters