थंडीच्या दिवसात आरोग्याची (health) काळजी घेणे अधिक गरजेचे असते. थंडीच्या हंगामात आपली डायजेशन सिस्टम सुस्त पडते. पाणी कमी प्यायल्याने बॉडी सुद्धा डिहायड्रेट होऊ लागते. अशावेळी आजारी पडण्याची शक्यता खुप जास्त असते.
आरोग्य तज्ञांच्या मते हिवाळ्यात काही वस्तू रिकाम्यापोटी खाल्ल्याने आजार दूर राहतात. शिवाय संपूर्ण दिवस एनर्जी राहते. यासाठी आपल्याला थंडीत नियमित रिकाम्या पोटी महत्वाच्या काही आहाराचा समावेश करावा. तो कोणता याविषयी जाणून घेऊया.
वजन आणि पोटाची चरबी कमी करा 'या' महत्वाच्या टिप्सने; जाणून घ्या सविस्तर
1) पपई
पपई सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर राहतात. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी होते, हृदयाचे आजार दूर राहतात आणि वजन सुद्धा कमी होते.
2) कोमट पाण्यासह मध
हिवाळ्यात दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने आणि मधाने करा. यामुळे आतड्या स्वच्छ राहतात, विषारी घटक बाहेर पडतात, वजन कमी होते.
3) ओटमील
ओटमील खाण्याने शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. आतड्या निरोगी राहतात. उशीरपर्यंत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
‘या’ तारखेनंतर राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4) भिजवलेले बदाम
बदाम रात्री भिजवून सकाळी खा. बदाम पोषणासह शरीर गरम ठेवते.
5) भिजवलेले अक्रोड
बदामप्रमाणे अक्रोड सुद्धा भिजवून खावेत. यात पोषकतत्व जास्त असतात. 2-5 अक्रोड रात्री भिजवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खा.
6) ड्राय फ्रूट्स
नाश्ता करण्यापूर्वी एक मुठ सुकामेवा खा. यामुळे पचन सुधारते, पोटाचा पीएच स्तर सामान्य राहतो. परंतु जास्त प्रमाणात खाऊ नये.
महत्वाच्या बातम्या
आता खत-पाण्याविना शेती पिकणार; जादूचे गहू बियाणे लॉन्च, जाणून घ्या सविस्तर
ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका; भाज्यांचे दर तेजीत, जाणून घ्या किमती
सणासुदीनंतर बाजारात खळबळ; 10 ग्रॅम सोन्या-चांदीचा भाव किती बदलला? जाणून घ्या
Share your comments