कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात.जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात.
प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, लवणे (खनिज) आणि मेद भरपूर प्रमाणात असतात 100 ग्रॅम कडधान्यात थायमीन (जीवनसत्व ब-1) रिबोफलेवीन (जीवनसत्व ब-2) 0.18 ते 0.26 मिलीग्रॅम आणि नायसीन 2.1 ते 2.9 मिलीग्रॅम असतात. चुना 76 ते 203 मिलीग्रॅम, लोह 7.3 ते 10.2 मिलीग्रॅम, स्फुरद 300 ते 433 मिलीग्रॅम या प्रमाणात असते. सोयाबीन अपवाद आहे. त्यामध्ये 18 ते 20 टक्के मेद असते. कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, लवणे आणि मेद यांची एकत्रीत उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधांन्याना आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
दररोच्या आहारात आपण 40 ते 90 ग्रॅम मोड आलेल्या धान्याचा आहारात वापर करता येतो तसेच यापेक्षा जास्तही आहारात वापर झालेल्या त्यापासून अपाय होत नाही कारण ते नैसर्गिक आहार आहे. मोड आलेली धान्य वजन तत्यांच्या मुळच्या वजनापेक्षा अडीचपट जास्त होते व एकदल धान्य ही त्यांच्या मुळच्या वजनापेक्षा दुप्पटीने वाढते. योग्य प्रमाणात वापर करण्यात येऊ शकतो.
मोड आलेल्या धान्यांचा वापर आपण व घरातील सर्वांसाठी चालु केल्यास बरेच आजार कमी करण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने संधीवात, रक्तदाब, मुळव्याध, मधुमेह, मणक्याचा आजार, गुडगेदुखी, पित्त, आळशीपणा, सफेद डाग, भुक न लागणे किंवा जास्त भुक लागणे, केस गळणे, शरीरातील उष्णता, अॅलर्जी, दमा या आजारावर फायदेशीर ठरते.
मोड आलेल्या धान्याचे आरोग्यदायी फायदे
- मोड आलेल्या धान्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांना हेल्दी ठेवते. याच्या नियमित सेवनाने शरीर उर्जावन राहते. किडनी, ग्रंथी आणि तांत्रिक तंत्राची मजबुती तसेच नवीन रक्त कोशिकांचे निर्माण करण्यातही या धान्याची मदत होते. अंकुरित गव्हामध्ये उपलब्ध असलेल तत्त्व शरीरातील अतिरिक्त वसा शोषून घेण्याचे काम करतात.
- मोड आलेल्या धान्यामध्ये अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन ए, बी, सी आढळून येते. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयरन आणि झिंक मिळते.
- मोड आलेल्या धान्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम स्तर वाढतो. हे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर काढण्यास मदत करते.
- मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले टॅनीन आणि फायटीक एसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुण्याचे शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा होतो.
- मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात.
- मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्वे मोठया प्रमाणावर वाढते.
- सुकविलेले मोड थोडया वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वांनी समृध्द असतात.
- मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कर्बोदकांची पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजीना मोड आलेली कडधान्ये.
- मोड आलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हे शरीराला फिट ठेवतात. यातून मिळणार्या प्रोटीनमुळे हाडे मजबूत होतात
- मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्व हे 2 ते 6 मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅम पर्यंत वाढू शकते.
- मोड आलेल्या धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. याचे सेवन केल्याने पाचन प्रक्रिया सुधारते. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, गॅस, एसिडिटी यासारख्या समस्या नष्ट होतात
- मोड आलेल्या धान्याचे दाणे चावून-चावून खाल्ल्यास शरीरातील पेशी शुद्ध होतात. यामुळे नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते
- मुग, मसूर, हरभरे शरीरातील ताकद वाढवतात. अशी कडधान्ये खाल्ल्याने शरीरात असणारे हानिकारक एसिडस सहज बाहेर काढण्यास मदत मिळते. या आहारामुळे तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता.
लेखक:
एकनाथ शिंदे व डॉ. विजया पवार
अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
9404191789
Share your comments