मानवी आरोग्यातील जवसाचे महत्व

03 August 2019 07:21 AM


जवस हे तेल बी सर्वांना परीचित आहे. जवस रब्बी हंगामात येणारे पिक असून जवसाचे उगमस्थान हे इजिप्त मधील “मेझोपोटोमीया” या ठिकाणी असून ग्रीस मध्ये प्रथमत: जवसाचा वापर आहारामध्ये करण्यात आला. पण आता मात्र जगाच्या पाठीवर बऱ्याच भागामध्ये जवस उत्पादीत केले जाते.

भारतामध्ये तर जवसाचे उत्पादन 3.1 मिलीयन टन एवढ्या प्रमाणात होते. जवसाचे अनेक उपयोग आहेत म्हणून जवसाला बहुपयोगी तेलबी असेही म्हणतात. जवसाचा वापर आपण आहारामध्ये तर करतोच पण त्याशिवाय जवसाचे इतरही काही उपयोग आहेत जसे की जवसाच्या तंतूपासून कापड व वस्तू बनविणे. जवसाच्या तेलाचा उपयोग हा पेंटस तयार करण्यासाठी केला जातो.

जवसाचे पोषण मुल्य:

जवस हे पोषक तत्त्वे समृद्ध बी आहे जवसामध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मुबलक प्रमाणात आहेत. जवसातील स्निग्धांशामध्ये ओमेगा-3 व ओमेगा-6 स्निग्धांशाचे प्रमाण 57% एवढे आहे. ह्या सर्व पोषक घटकांमुळे जवस हे आरोग्यास अतिशय उपयुक्त फायदेशीर ठरते. जवसाचे आरोग्यास असणारे फायदे अनेक आहेत.

अन्न पदार्थ

कर्बोदके (ग्रॅम)

स्निग्ध
पदार्थ (ग्रॅम)

खनिज द्रव्ये
(मि. ग्रॅम)

तंतुमय पदार्थ
(मि. ग्रॅम)

उर्जा
(कि.कॅ)

कॅल्शियम
(मि. ग्रॅम)

लोह
(मि. ग्रॅम)

जवस

28.9

37.1

3.5

4.8

530

124

4.4

 


जवसाचे आरोग्यासाठी फायदे:

 • हृदयविकार कमी करणे
  जवस हे ह्रदयविकार कमी करण्यासाठी आवश्यक व उपयुक्त तेलबी आहे. कारण जवसामध्ये असणारे ओमेगा-3 स्निग्धांम्ले हे रक्तातील अनावश्यक स्निग्धांश कमी करण्यास मदत करते त्याचप्रमाणे जवसामध्ये असणारे लेसीथीन हे देखील रक्तातील अनावश्यक व जास्तीचे स्निग्धांश बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे ह्रदयविकार टाळण्यास मदत होते.

 • डायबेटीज
  जवस हे रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. जवसामध्ये असणारे तंतुमय घटक हे रक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवते व त्यामुळे डायबेटीज नियंत्रणात राहतो. त्याचप्रमाणे ओमेगा-3 स्निग्धांम्ले पेशींना लवचीक राहण्यास मदत करतात. लवचीक पेशी ह्या शरीरातील अनावश्यक साखर शोषून घेण्याचे काम चांगल्या प्रकारे करू शकतात अशाप्रकारे जवस हे डायबेटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

 • कॅन्सर
  जवसामध्ये असणाऱ्या तंतुमय  घटकांमुळे कॅन्सर मुख्यत:आतड्यातील कॅन्सर हा नियंत्रणात राहू शकतो. जवसामध्ये असणारे तंतुमय घटक आणि अल्फा लिनोलेनीक स्निग्धाम्ले कॅन्सरवर उपचारात्मक कार्य करतात.

 • बद्धकोष्ठता
  जवसामध्ये असणाऱ्या तंतुमय घटकामुळे बद्धकोष्ठता होत नाही. तंतुमय पदार्थ पाणी शोषून घेतात. त्यामुळे पचनसंस्था सुलभपणे साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्टता असेल तर ती नियंत्रणात आणता येते.

 • रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे
  लिग्नन नावाचे तंतुमय पदार्थ व अल्फा लिनोलेनीक स्निग्धाम्ले हे दोन घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. ह्या सर्व घटकांमुळे जवस हे आरोग्यास हितकारक आहेच त्याशिवाय जवसामध्ये आणखी इतर आवश्यक असे घटक आहेत. जसे की “म्युसीलेज” हे जवसावरील असणाऱ्या कवचाचे आवरणामध्ये असते. म्युसीलेजचे प्रमाण जवसामध्ये 12% एवढे आहे. म्युसीलेज हा मऊ व चमकणारा घटक आहे. म्युसीलेजचे देखील अनेक फायदे आहेत. म्युसीलेज पाण्यामध्ये भिजत ठेवल्यास फुगुन गुळगुळीत व मऊ असा पदार्थ तयार होतो. त्यामुळे जवस आहारामध्ये घेतल्यास जवसामध्ये असणारे म्युसीलेज हे पोटामधील क्रिया सुरळीतपणे पार पाडते. जवसाच्या या सर्व गुणधर्मामुळे ते उपचारात्मक अन्नपदार्थ म्हणूनही वापरता येते.

जवसाचे विविध आरोग्यदायी पदार्थ:

जवसाचा वापर आहारामध्ये मुख्यत्त्वे चटणीच्या स्वरूपात केला जातो. परंतु जवसाचा वापर करून इतरही बरेच पदार्थ बनविता येतात. ब्रेड, बिस्कीटे, फराळाचे पदार्थ तसेच दैनंदीन वापरात येणाऱ्या पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी जवसाचा वापर करता येतो. जवसापासून बनविलेले लाडू, बर्फी, चकली, शेव हे पदार्थ सुद्धा खूप चवदार बनतात.

लेखक:
श्री. एस.डी. कटके, प्रा.डॉ. आर.बी. क्षीरसागर
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

linseed javas जवस egypt इजिप्त म्युसीलेज mucilage omega 3 ओमेगा 3 डायबिटीज मधुमेह Diabetes cancer कॅन्सर
English Summary: Importance of Linseed in Human Health

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.