1. आरोग्य सल्ला

उन्हाळ्यात वजन कमी कराचेय तर दररोज रिकाम्या पोटी प्या Cucumber Water

आजकाल लोक जंक फूड्सवर(junk foods) अधिक अवलंबून राहू लागले आहेत. मात्र यामुळे आरोग्यावर(health) मोठा परिणाम होतो. तज्ञांच्या मते जंक फूड खाल्ल्याने वजन वेगाने(weight gain) वाढू लागते. सोबतच जंक फूड पचण्यास वेळ लागतो. यामुळे इतर आजारांचाही धोका वाढू लागतो. यामुळे जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Cucumber Water

Cucumber Water

आजकाल लोक जंक फूड्सवर(junk foods) अधिक अवलंबून राहू लागले आहेत. मात्र यामुळे आरोग्यावर(health) मोठा परिणाम होतो. तज्ञांच्या मते जंक फूड खाल्ल्याने वजन वेगाने(weight gain) वाढू लागते. सोबतच जंक फूड पचण्यास वेळ लागतो.

यामुळे इतर आजारांचाही धोका वाढू लागतो. यामुळे जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे. दरम्यान, लठ्ठपणा(obesity) ही एक अनुवांशिक समस्याही आहे. यासाठी अनेक प्रकारचे डाएट प्लान ट्रेंडिंगमध्ये आहेत. लोक आपल्या सुविधेनुसार डाएट प्लान निवडत असतात. जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त आहात आणि वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचे आहे तर तुम्ही Cucumber Water प्या.

 

काकडी

U.S.FOOD DRUG च्या चार्टनुसार १०० ग्रॅम काकडीमध्ये केवळ १० कॅलरीज असतात. तर काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. याशिवाय त्यात फायबर असते जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. डॉक्टर्सही वजन कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. एका संशोधनानुसार Cucumber Diet Plan फॉलो केल्यास फार कमी दिवसांत तुम्ही मोठ्या प्रमाणात वजन घटवू शकता. या डाएट प्लानमध्ये फळे, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जसेच अंडी, चिकन, मासे खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

Cucumber Water कसे असते फायदेशीर

काकडीमध्ये पाचनसाठी उपयुक्त असे एन्झाईम असते ज्याला एरेप्सिन असे म्हणतात. हे एरेप्सिन प्रोटीनला तोडण्यासाठी मदत करते. यामुळे आतडेही स्वच्छ होतात. यात फायबर असते. ज्यामुळे याच्या सेवनाने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. सोबतच सतत खाण्याची सवयही मोडते. काकडीच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच शरीरातील एक्स्ट्रा चरबीही कमी होते

English Summary: If you want to lose weight in summer, drink Cucumber Water on an empty stomach every day Published on: 14 May 2021, 05:52 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters