आपण आहारामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर करतो. चव वाढवण्याबरोबरच कडीपत्ताचा वापर हा औषधी गुणधर्मासाठी सुद्धा केला जातो. कढीपत्त्याच्या पानाला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे विविध प्रकारच्या चटण्यामध्ये आणि मसाल्यात याचा वापर प्रमाणात केला जातो.
आपण जाणून घेऊया कढीपत्ताच्या पानांमधील औषधी फायदे
कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक मेथी कोथिंबीर या भाज्यांपेक्षा अ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कर्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारणपणे दुप्पट असते.
कढीपत्ता हा शीतल गुणधर्माचा असल्याने जुलाब, उलटी होत असेल व काही वेळा त्यातून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याची पाने पाण्यासोबत वाटून ते पाणी गाळून घ्यावे व एक चमचा या प्रमाणात दोन-तीन तासांच्या अंतराने द्यावे. यामुळे उलटी कमी होऊन रक्तस्राव थांबतो.
बरेचदा त्वचेवर पुरळ उठून खाज येते किंवा शरीरावर झालेली जखम भरून येत नाही, तेव्हा कढीपत्त्याची पाने वाटून त्यांचा कल्क शरीरावर चोळावा व जखमेवर लावावा.
एखाद्या वेळी शरीरावर विषारी कीटकाच्या दंशाने सूज आलेली असते. त्या सुजलेल्या ठिकाणी जर आपण कढीपत्त्याची पाने वाटून त्यांचा लेप लावला तर सूज उतरते.
स्त्रोत- कृषी नामा
Share your comments