सुदृढ शरीरासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी आपला आहार संतुलित असणे खूप गरजेचे असते. शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक आहेत ते संतुलित प्रमाणात आपण घेत असलेले आहारातून मिळणे ही एक निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असते. परंतु आपल्याला माहित आहेस की, जर काही शारीरिक समस्या असल्या तर त्या त्या समस्यांनुरूप आहारामध्ये काही गोष्टींचे पथ्य पाळण्याचा सल्ला दिला जातो.
कारण काही गोष्टींनी शरीरासाठी आवश्यक असलेले अन्नपदार्थ हे काही आजारांमध्ये घातक ठरतात. जर आपण शेंगदाण्याचा विचार केला तर शेंगदाणे म्हटले म्हणजे गरिबाचं बदाम म्हणून संबोधले जाते.
नक्की वाचा:आयुर्वेदात चारोळीला आहे विशेष महत्व, जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे
आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप काही शेंगदाण्याचे फायदे असून त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट,फॅट तसेच प्रथिने इत्यादीचा उत्तम स्त्रोत आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील शेंगदाण्याचा उपयोग होतो. शेंगदाण्याचे बरेच आरोग्यविषयक फायदे आहेत परंतु आरोग्यासाठी उपयुक्त असलेले शेंगदाणे काही लोकांचे आरोग्याला हानिकारक देखील आहेत.
काही आजारांमध्ये शेंगदाणे खाल्ले तर शरीराला ते धोकादायक ठरू शकतात.या लेखात आपण अशा कोणत्या आरोग्यविषयक समस्या आहेत की ज्यामध्ये शेंगदाणे खाणे घातक ठरू शकते. त्या विषयी माहिती घेऊ.
या आरोग्य विषयक समस्यांमध्ये शेंगदाणे खाणे आहे धोकादायक
1- लिव्हरची समस्या असलेल्यांसाठी- बऱ्याच व्यक्तींना यकृत म्हणजेच लिव्हर विषयी समस्या असते. अशा व्यक्तींनी शेंगदाणे खाल्ले तर शरीरातील अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण वाढते. हा पदार्थ हानिकारक असून तो लिव्हरच्या आरोग्याला हानी पोहोचवतो. त्यामुळे तुम्हाला जर लिव्हर विषयी कोणत्याही प्रकारची आरोग्य विषयक समस्या असेल तर शेंगदाणे खाणे घातक ठरू शकते.
2- हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी- बऱ्याच जणांना हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. अशा लोकांनी शेंगदाणे खाण्याचे टाळणे उत्तम ठरते. जर शेंगदाणे खाल्ले तर शरीरामध्ये सोडियमच्या प्रमाणात वाढ होते व सोडियम जास्त झाले तर उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.
हृदय रोगाचा देखील धोका वाढू शकतो. शेंगदाणा खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो त्यामुळे शेंगदाणे खाणे टाळलेले बरे. वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.
3- सांधेदुखीची समस्या असलेल्यांसाठी- बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखीची तक्रार असते. हिवाळ्यामध्ये हा त्रास जास्त वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर शेंगदाणे जास्त खाल्ले तर सांधेदुखीची समस्या वाढायला मदत होते. यामध्ये असलेले लेक्टिन्स सांधेदुखी आणि सूज वाढवण्यासाठी खूप परिणामकारक ठरतात. त्यामुळे जर हिवाळ्यामध्ये सांधेदुखीचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी शेंगदाणे खाणे टाळावे.
( टीप- वरील माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगतरीत्या आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. आहारात बदल आणि कुठलेही उपचार करण्या अगोदर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Share your comments