बरेचदा शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी बिघाड झाला तर त्याची लक्षणे शरीराच्या बाह्य अंगांवर दिसून येतात. शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये कुठलीही आरोग्यविषयक समस्या निर्माण व्हायला लागली तर तिचे लक्षणे शरीरावर जाणवतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. आता लिव्हर म्हणजेच यकृत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लिव्हर हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे.
यामध्ये समस्या निर्माण झाली तर त्याचे अनेक लक्षणे शरीरावर दिसतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे पायावर देखील त्याची लक्षणे दिसू शकतात. लिव्हरमध्ये काही समस्या असेल तर पायांवर कोणती लक्षणे दिसतात? याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:दुधासोबत करा या पदार्थाचे सेवन, वजन होईल झटपट कमी, वाचा सविस्तर
पायांवर दिसणारी लक्षणे
1- पायावर येते सूज-तज्ञांच्या मते,जर पायावर किंवा तळपायांवर सूज दिसत असेल तर हे यकृतासंबंधी समस्यांच्या संकेत असू शकतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर फॅटी लिव्हर डिसीज, सोरायसिस किंवा हेपिटायटीस बी अथवा सी इत्यादी समस्या असू शकतात.
2- पायावर मुख्यत्वे तळपायावर येणारी खाज- हेपेटायटिस च्या काही रुग्णांमध्ये हात आणि तळ पायावर खाज येण्याची समस्या उद्भवते. हे pruritus नावाच्या समस्येमुळे होते व या समस्या शिवाय यकृताच्या आजारामुळे देखील हात आणि पायांचे त्वचा जास्त कोरडी होते व खाज येते.
3- तळपायावर वेदना जाणवणे- समजा तळपायावर जर वेदना जाणवत असतील तर समस्या लिव्हर डिसीज मुळे होऊ शकते.ज्यावेळेस लिव्हर व्यवस्थित काम करू शकत नाही
त्या वेळी एडिमामध्ये द्रव्य जमा होणे सुरू होते. पायांमध्ये पेरिफेरल न्युरोपॅथीलाही क्रोनिक लिव्हर डिसिज सोबत जोडून बघितले जाते. लिव्हरमध्ये समस्या झाल्यावर तळपायामध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्या होऊ शकते.
4- पाय सुन्न किंवा बधीर होणे- लिव्हरच्या आरोग्यविषयक समस्याने त्रस्त लोकांना हेपिटायटीस सी इन्फेक्शन किंवा अल्कोहोलिक लिवर डीसीजमुळे पाय सुन्न होण्याची किंवा पायात झीनझीन्या येण्याची समस्या उद्भवते. तसे पाहायला गेले तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये देखील ही समस्या पाहायला मिळते.
लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ही समस्या दिसणे खूप सामान्य आहे. कारण लिव्हर ग्लुकोज लेव्हल कंट्रोल करण्यासाठी मदत करते.
( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीची व्यक्तिगत आणि कृषीजागरण समूह सहमत असेलच असे नाही.कुठलाही उपचार करण्याअगोदरच व आहारात बदल करण्या अगोदर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
नक्की वाचा:Health Tips: दररोज खजूर खाल्ल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे,शरीर राहते तंदुरुस्त
Share your comments