जर आपण दुधाचा विचार केला तर दूध हे सगळ्यांचे आवडते पेय आहे. परंतु असे बरेच व्यक्ती आहेत ज्यांना दूध आवडतच नाही. त्यामुळे दुधामध्ये काही विशिष्ट प्रकारचे ड्रायफ्रुट्स जर टाकले तर नक्कीच दुधाची चव तर वाढतेच परंतु त्याची पौष्टिकता देखील वाढते व त्याचा शरीराला खूप मोठा फायदा होतो. या लेखात आपण या बद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Health Tips: अविश्वसनीय आहेत शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, वाचा डिटेल्स
दुधात मनुके,बदाम आणि अंजीर टाकून पिण्याचे आरोग्यदायी फायदे
1-सर्दी व कोरडा खोकल्यासाठी उपयुक्त-दुधामध्ये सुके अंजीर,बदाम आणि मनुके मिसळून जर पाहिले तर सर्दी खोकल्याच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
एवढेच नाही तर मनुका कोरडा खोकला चांगला करण्यास मदत करतो व रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. वातावरणामुळे होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनला आळा बसतो. लहान मुलांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी हे दूध जरूर प्यायले पाहिजे.
2- बद्धकोष्ठतेपासून मुक्तता- बऱ्याच जणांना खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतात चुकीची जीवनशैली यामुळे पोटाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात व त्यातीलच महत्त्वाची समस्या म्हणजे बद्धकोष्ठता ही होय. दुधामध्ये जर तुम्ही अंजीर, बदाम आणि मनुके मिसळून सेवन केले तर बद्धकोष्टतेची समस्या दूर होते.
3- हाडांच्या आरोग्यासाठी- सध्या तरुण वयामध्ये हाडांच्या समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत जर दुधामध्ये अंजीर, मनुके आणि बदाम टाकुन प्यायले तर हाडे मजबूत होतात. तसेच दूध आणि बदाम यांच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी देखील खूप मदत होते..
4- हृदयाच्या आरोग्यासाठी- अंजीर व बदाम यामध्ये पोटॅशियम असते मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. त्यामुळे हे दूध हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असून हृदय निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर या दुधाचे सेवन करायला हवे.
5- लहान मुलांना फायदेशीर- मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी दूध आवश्यक असून मुलांना दूध देताना त्यामध्ये अंजीर,बदाम आणि मनुके मिसळून दिले तर मुले नेहमी निरोगी राहतील व आजारी पडणार नाही व त्यांची वाढ चांगली होते.
मनुके,अंजीर आणि बदाम दुधात टाकण्याची पद्धत
यासाठी एक ग्लास दूध गरम करून ठेवायचे. त्या नंतर भिजवलेले बदाम, अंजीर, मनुके, खजूर आणि पिस्ता बारीक करून मिक्स करावे. हे मिश्रण दुधात मिसळून घ्यावे व हे दूध पाच ते सात मिनिटे चांगले उकळावे. आता हे दूध चांगले गाळून घ्यावे व नंतर सेवन करावे. रात्री झोपताना हे दुध प्यायला तर अनेक फायदे मिळतात.
Share your comments