1. आरोग्य सल्ला

निंबू खाल्ल्याने किडनीवर काही विपरीत परिणाम होतो का, जाणुन घ्या याविषयी

मित्रानो अनेक लोक निंबू खाल्ल्यामुळे किडनीवर परिणाम होतो म्हणुन निंबू खाने टाळतात. आज आपण निंबू खाल्ल्याने खरंच किडनीवर खरंच काही परिणाम होतो का याविषयीं जाणुन घेणार आहोत. आपल्याकडे नॉनव्हेज असले की लिंबू हा लागतोच. अनेक लोक लिंबू पिळून नॉनव्हेज खाने पसंत करतात त्यामुळे लिंबूच्या शौकीन लोकांसाठी लिंबूचे फायदे आणि तोटे जाणुन घेणे महत्वाचे आहे म्हणुन आज आपण निंबू खाण्याचे फायदे तसेच तोटे जाणुन घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
lemon

lemon

मित्रानो अनेक लोक निंबू खाल्ल्यामुळे किडनीवर परिणाम होतो म्हणुन निंबू खाने टाळतात. आज आपण निंबू खाल्ल्याने खरंच किडनीवर खरंच काही परिणाम होतो का याविषयीं जाणुन घेणार आहोत. आपल्याकडे नॉनव्हेज असले की लिंबू हा लागतोच. अनेक लोक लिंबू पिळून नॉनव्हेज खाने पसंत करतात त्यामुळे लिंबूच्या शौकीन लोकांसाठी लिंबूचे फायदे आणि तोटे जाणुन घेणे महत्वाचे आहे म्हणुन आज आपण निंबू खाण्याचे फायदे तसेच तोटे जाणुन घेणार आहोत.

  • मित्रांनो लिंबू खाल्ल्याने आपल्या किडनीवर कुठलाच विपरीत परिणाम होत नाही उलट लिंबूचे संतुलित सेवन हे किडनीच्या रोगावर लाभदायी असल्याचे सांगितले जाते. निंबू मध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, शिवाय लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड व अँटीआक्सिडेंट्स हे देखील असतात आणि हे घटक किडनीच्या रोगावर लाभदायक असल्याचे डॉक्टर सांगतात. म्हणुन जर आपल्याला किडनीसंबंधी काही विकार असेल तर आपण निंबूचा संतुलित वापर करू शकता यामुळे आपल्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम हा होणार नाही.

     क्रिएटिनिन हे एक खराब रासायनिक उत्पादन आहे जे शरीरात जमा होते आणि त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक व्याधीना सामोरे जावे लागू शकते. जर तुमच्या शरीरात क्रिएटिनिनची पातळी हि प्रमाणापेक्षा अधिक झाली असेल तर लिंबाच्या सेवनाने ती पातळी काही कमी होणार नाही, पण लिंबूच्या संतुलित सेवणाने हे ऍसिड तुमच्या शरीरात वाढणार देखील नाही.

त्यामुळे लिंबूचे सेवन क्रिएटिनिन मेंटेन कारण्यास चांगले लाभदायी ठरू शकते. आपली किडनी हे शरीरातील क्रिएटिनिन काढून टाकण्यास मदत करते आणि जर आपल्याला मूत्रपिंडासंबंधी म्हणजेच किडनीविषयी काही विकार असेल तर हे क्रिएटिनिन नावाचे रासायनिक घटक किडनी बाहेर काढू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक रोगाना सामोरे जावे लागू शकते. म्हणुन आपण असे म्हणू शकतो की लिंबू सेवन केल्याने क्रिएटिनिनवर एक समान प्रभाव पडतो म्हणजे लिंबूच्या सेवणाने हे विषारी घटक कमीही होत नाही आणि वाढतहि नाही.

निंबू किडनी संबंधी आजारात वाईट की चांगला

असं सांगितले जाते की निंबूचे सेवन हे किडनी संबंधी आजारात फायद्याचे पण नाही आणि तोट्याचे पण नाही

परंतु  जर आपण निंबूचे जास्त प्रमाणात सेवन केले तर आपल्याला आरोग्यविषयक इतर तक्रारीचा सामना करावा लागू शकतो. जास्त लिंबूचे सेवन केल्याने डायरीया, उलट्या होणे, जीव घाबरणे इत्यादी समस्या भेडसावु शकतात. निंबू चे पाणी जर आपण जास्त पीत असाल तर मूत्रद्वारे आपल्या शरीरातून वेस्ट बाहेर निघेल आणि त्यामुळे आपल्याला लाभ मिळेल परंतु याचे सेवन हे संतुलितपणे करणे आवश्यक आहे.

टीप :- सदर आर्टिकल मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची कृषी जागरण पुष्टी करत नाही. या फक्त सूचना आहेत याचा उपयोग माहिती म्हणुन घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English Summary: if eat lemon that effect on kidney know reality behind Published on: 17 November 2021, 08:51 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters