1. आरोग्य सल्ला

या घरगुती उपायांनी चुटकी सरशी पळेल तोंडाची दुर्गंधी

आपल्याला सामाजिक जीवनात वावरत असताना चांगल्या सवयी असणे फार गरजेचे असते. त्यामध्ये शरीरस्वच्छतेच्या बाबतीत तर निष्काळजीपणा आपल्याला व्यावहारिक जीवनात महागात पडू शकतो. बरेचदा आपण महागडी कपडे, फॅशनेबल कपडे घातले पंजाब तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर त्या सगळ्या थाटाला काहीच अर्थ उरत नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mouth smell

mouth smell

आपल्याला सामाजिक जीवनात वावरत असताना चांगल्या सवयी असणे फार गरजेचे असते. त्यामध्ये शरीरस्वच्छतेच्या बाबतीत तर निष्काळजीपणा आपल्याला व्यावहारिक जीवनात महागात पडू शकतो. बरेचदा आपण महागडी कपडे, फॅशनेबल कपडे घातले पंजाब तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर त्या सगळ्या थाटाला काहीच अर्थ उरत नाही.

या लेखात आपण तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे आणि उपाय याबद्दल माहिती घेऊ.

 तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे

 बऱ्याच लोकांना ही समस्या असते. यामागे बरीचशी वेगळी कारणे असतात. वेळेवरब्रश न करणे जास्त मसालेदार आहार असणे,कांदा, लसणाच्या जेवणात अतिवापर करणे, दारू पिणे तसेच तंबाखू आणि गुटखा असे पदार्थ चघळणे अशा अनेक कारणामुळे तोंडातून वास येतो.

तसेच महत्त्वाचे कारण म्हणजे अपचन हे देखील तोंडाला दुर्गंधी येण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

 तोंडाचा येणारा वास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

  • डाळिंबाचीसाल- डाळिंब फळाप्रमाणे डाळिंबाची साल देखील आरोग्यासाठी गुणकारी असते. तिचे अनेक फायदे आहेत. ही साल पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी येणे बंद होते.
  • तुळशीची पाने घरोघरी अंगणामध्ये तुळशीची झाड असते. तुळशीच्या पानांमुळे तोंडाला येणारा घाण वास कमी होतो. तुळशीची पाने चावून खाल्ल्याने तोंडाला येणारा वास बंद होतो.

 

  • लवंग- लवंग तोंडात ठेवल्याने देखील तोंडातली दुर्गंधी घालवता येते. इतकेच नाही तर लवंग ही दात दुखत असेल तर त्यावर देखील उपाय म्हणून वापरता येते.
  • बडिशोप बडीशोप आपण जेवण झाल्यानंतर खातो. बडीशेप ला माउथ फ्रेशनर म्हणून खाल्ले जाते. बडीशेप खाल्ल्याने देखील तोंडाचा वास जातो.
  • पेरूचीपाने पेरू हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी असतो. पेरूची पाने देखिल शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यांचा वापर अनेक रोगांच्या उपचारासाठी केला जातो. पेरूची कोवळी पाने चघळणे तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी उपयोगी ठरते.

 

English Summary: homemade remedy on dirty smell of mouth Published on: 04 October 2021, 09:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters