ड्रॅगन फ्रुटची शेती ही थायलंड या देशात मोठ्या प्रमाणात केले जाते. या पिकाची लागवड वेळ स्वरूपाचे असल्याने शेतात सिमेंटचे खांब उभे करून रोपांची लागवड केली जाते. लागवडीनंतर एक वर्षाला फळधारणा सुरू होते व वीस पंचवीस वर्षे उत्पन्न घेता येते. महाराष्ट्रामध्ये हे पीक दुर्मिळ आहे परंतु आता बरेच शेतकरी पुढे येत आहेत.
ड्रॅगन फ्रुट ही निवडुंगा सारखी दिसणारी काटेरी वेल असून ती साधारणपणे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान फळे येतात. एका झाडापासून तयार वेलींना एका तोडणी सहा ते आठ फळे येतात. फळांना त्यांच्या दर्जानुसार प्रतिकिलो शंभर ते दीडशे रुपये भाव मिळतो. ड्रॅगन फ्रुट हेरो प्रतिकारशक्ती वाढवणारे असून त्यामुळे पांढरा पेशींची वाढ होते. यामुळे आरोग्यासाठी महत्त्वाचे समजले जात असल्याने बाजारात त्याला चांगली मागणी असते. एकदा लागवड केल्यानंतर साधारणतः एक वर्षानंतर फळधारनेला सुरुवात होते. या फळामध्ये लाल रंगाच्या फुलांची लागवड केली आहे. या पिकावर मुख्य करून लाल मुंग्या व बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. अत्यंत कमी खर्चाचे फवारणी करून ते लवकर नष्ट होते व अन्य खर्च कमी असल्याने हे पीक भरपूर प्रमाणात परवडते.
हे फळ रोग प्रतिकारशक्ती वाढते व पांढर्या पेशींचे प्रमाण वाढते. यामुळे ड्रॅगन फ्रुट कोरोना आजारावर लाभदायी आहे. हे पीक कमी खर्चात येत असल्याने व आरोग्यासाठी लाभदायक असल्याने बाजारात मागणी जास्त आहे. कमी खर्चात देखील चांगले उत्पन्न मिळत असल्याने बरेच शेतकरी ड्रॅगन फ्रुट लागवड कडे वळत आहेत. महाराष्ट्र मध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच हैदराबाद व नांदेड या ठिकाणी बाजारपेठेत चांगला भाव मिळतो.
ड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी गुणधर्म
-
ड्रॅगन फ्रुट हे मधुमेह, संधिवात, कर्करोग आणि दमा इत्यादी आजार नियंत्रित करते.
-
शरीरातील हानीकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
-
अन्न पचन शक्ती वाढते.
-
यामध्ये जीवनसत्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.
-
तसेच या फळांपासून जॅम, आईस्क्रीम, जेली आणि वाइन सुद्धा बनविता येते.
-
सौंदर्यप्रसाधनांमध्ये फेस पॅक म्हणून तुम्ही याला वापरू शकता.
-
डेंग्यू व मलेरियाच्या आजारात ड्रॅगन हे फळ खाल्ले जाते.
-
हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.
Share your comments