मसाल्याच्या पदार्थातली काळी मिरी ही औषधी आहे.लाल मिरचीच्या तुलनेत ती कमी दाहक आणि अधिक गुणकारी आहे. म्हणूनच मसाल्यामध्ये लाल मिरचीऐवजी काळ्या मिरीचा उपयोग केला जातो. काळ्या मिरीचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर ती रासायनिक गुणसुद्धा देते.आयुर्वेदात सर्वप्रकारचे जीवाणू,विषाणू इत्यादींचा नाश करणारी औषधी म्हणून काळी मिरी ओळखली जाते मिरीमुळे खाण्याचा स्वाद वाढतोच,पण त्याचबरोबर तिच्या सेवनाने पोटातील हायड्रोक्लोरिक अॅसिड वेगाने वाढते आणि पचन योग्य प्रकारे होते. मिरीमध्ये अनेक प्रकारचे अँटिबॅक्टेरिया असतात.ते आतड्यामध्ये होणारा संसर्ग बरा करतात.अनेक विकारांवर काळी मिरी गुणकारी ठरते.
सर्दी :सर्दीमुळे घसा खराब असेल तर काळ्या मिरीचा काढा फायदेशीर ठरतो. सर्दी झाल्यानंतर गरम दुधात काळी मिरी पूड टाकून हे दूध प्यावे. तसेच वारंवार सर्दी होत असेल, शिंका येत असतील तर एका मिरीपासून सुरुवात करून रोज एक मिरी वाढवत न्यायची १५ दिवसांपर्यंत असे करून पुन्हा एक-एक मिरी पुढचे १५ दिवस कमी करत जायचे अशा प्रकारे मिरी घेतल्यास वारंवार होणारी सर्दी एका महिन्यात समाप्त होते.घसा बसणे :काळ्या मिरीची पूड, तूप आणि साखर एकत्र करून हे चाटण घेतल्यास बंद गळा मोकळा होतो आणि आवाज देखील चांगला होतो.८-१० काळे मिरे पाण्यात उकळून या पाण्याद्वारे गुळण्या कराव्यात. यामुळे गळ्याला झालेला संसर्ग नाहीसा होतो.त्वचा रोग :काळी मिरी तुपात बारीक करून त्याचा लेप करावा. हा लेप त्वचेचा संसर्ग, फोड, मुरूम इत्यादींवर लावावा.
सर्दी, पडसे, खोकला :सर्दी,पडसे,खोकला झाल्यास ८-१० काळे मिरे,१०-१५ तुळशीची पाने एकत्र करून त्याचा चहा प्यावा, आराम मिळतो.खोकला :काळे मिरे ४-५ आणि सोबत १५ बेदाणे एकत्र खाल्ल्यास खोकला बरा होतो. काळी मिरी दुधात घालून घेतल्यास फायदाच होतो.१०० ग्रॅम गूळ विरघळवून त्यात २० ग्रॅम काळ्या मिरीची पावडर मिसळावी.थोडे थंड झाल्यानंतर त्याच्या छोट्या-छोट्या गोळ्या बनवाव्या. जेवल्यानंतर २-२ गोळ्या खाल्ल्यास खोकल्यासाठी आराम मिळतो. खोकला झाल्यास अर्धा चमचा काळ्या मिरीचे चूर्ण आणि अर्धा चमचा मध एकत्र करून हे चाटण दिवसातून ३-४ वेळा चाटावे. खोकला दूर होतो.कोरडा खोकला : कोरडा खोकला असल्यास १०-१५ ग्रॅम शुद्ध तूप घेऊन त्यात ४-५ काळे मिरे टाकावेत आणि ते गरम करावेत. काळी मिरी कडकडून वर येईल. तेव्हा भांडे गॅसवरून खाली उतरवावे. नंतर यामध्ये २० ग्रॅम पिठीसाखर घालावी.
काळी मिरी चावून खावून टाकावी. एक तासापर्यंत काही खाऊ नये. ही क्रिया दोन-तीन दिवस करावी.२ चमचे दही,१ चमचा साखर आणि ६ ग्रॅम काळे मिरे बारिक करून हे मिश्रण एकत्र करावे. यामुळे कोरडा खोकला आणि डांग्या खोकला दूर होतो.कफ :१ चमचा मधात २-३ काळ्या मिर्यांची पूड आणि चिमूटभर हळद एकत्र करून खाल्ल्यास सर्दीमध्ये तयार होणारा कफ कमी होतो.उलटी-जुलाब :उलटी, जुलाब होत असल्यास काळी मिरी, हिंग अणि कापूर प्रत्येकी ५ ग्रॅम घेऊन एकत्र करावे. त्याच्या छोट्या गोळ्या बनवून दर ३ तासांनी घ्याव्यात.पोट :पोट बिघडल्यास अर्ध्या लिंबवामध्ये मिरपूड आणि काळे मीठ भरावे, लिंबू गरम करून तो चोखावा आराम मिळतो.
संकलन- निसर्ग उपचार तज्ञ डॉ. प्रमोद ढेरे
पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक.
संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९.
Share your comments