आरोग्यवर्धक मोसंबी रस

Monday, 09 September 2019 08:04 AM


महाराष्ट्राची मोसंबी देशात सर्वदूर परिचित आहे . महाराष्ट्रात 85,000 हेक्टर क्षेत्रापैकी 35,000 हेक्टर क्षेत्रातील मोसंबी पिक उत्पादन देत आहे. इतर क्षेत्र नवीन लागवडीसाठी असल्यामुळे फळासाठी आलेले नाही फक्त क्षेत्र वाढवून उपयोग नाही. उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन 'सी' आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे अतिशय गुणकारी फळ असून त्यात ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असते.

मोसंबीच्या रसाचे फायदे:

 • हिरड्यातून रक्त येण्याची समस्या ही व्हिटॉमिन 'सी' च्या कमतरतेमुळे उद्भवते. मोसंबीच्या रसात व्हिटॉमिन 'सी' भरपूर प्रमाणात असल्याने या समस्येवर अतिशय फायदेशीर ठरतो.
 • पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मोसंबीचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. त्यातील आंबट-गोडपणामुळे आणि एसिडमुळे मोसंबीचा रस पचनक्रियेत मदत करतो. त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो.
 • मोसंबीचा रस मधुमेहींसाठीही उपयुक्त ठरतो. मधुमेहींनी 2 चमचे मोसंबीचा रस, 4 चमचे आवळ्याचा रस आणि 1 चमचा मध रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या आणि फरक पहा.
 • रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रक्तसंचार सुरळीत होतो. रोगप्रतिकराक क्षमता वाढते.
 • मोसंबीच्या रसात कॅलरिज खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. मोसंबीचा रस मध घालून घेतल्यास वजनवाढीची समस्या आटोक्यात येते.
 • गर्भवती महिलांसाठी मोसंबीचा रस खूप फायदेशीर आहे. याचा फायदा आई व गर्भातील बाळ दोघांना होतो.
 • डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी देखील मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब घालून डोळे धुतल्याने डोळ्यांच्या इंफेक्शनपासून संरक्षण होते.
 • मोसंबीचा रस चेहऱ्याला लावल्याने काळे डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. मोसंबीच्या रसाने रक्त शुद्ध होते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा उजळ होते.
 • मोसंबीचा रस पाण्यात घालून अंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी यांसारख्या समस्येंपासून सुटका होते.
 • मोसंबीच्या रसामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.
 • त्यातील व्हिटॉमिन 'सी' मुळे सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.
 • मोसंबीच्या रसात कॉपर असते. त्यामुळे केसांचे कंडिशनिंग करण्यासाठी मोसंबीचा रस उपयुक्त ठरतो. मोसंबीच्या रसाने केस धुतल्याने केस मुलायम, चमकदार होतात.
 • मोसंबीच्या रसाने ओठांना मालिश केल्यास ओठ फाटण्याची समस्या कमी होते.
 • रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे मुलांसाठी मोसंबी विशेष फायदेशीर आहे.
 • मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते.
 • हे पौष्टिक, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारं, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
 • याच्या सालीतून सुगंधी तेल मिळतं. तसंच मोसंबीच्या सालीचं चूर्ण फेसपॅकमध्ये वापरल्याने त्वचेवरील व्रण, मुरुम कमी होऊन सौंदर्य सुधारतं.
 • रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो.
 • अन्नपदार्थाचा स्वाद वाढण्यासाठी मोसंबीचा रस घालतात.
 • पथ्यकर असल्याने तापात किंवा आजारपणातही मोसंबीचा रस देता येतो.
 • रस गाळून प्यायल्यास कफदोष नाहीसा होतो.
 • अधिक श्रम, थकवा यामुळे घाम आल्यावर शरीरातील जलांश कमी होतो अशा वेळी मोसंबीचा रस घेणे उत्तम ठरतं.
 • हृदयाला हितकर असल्याने छातीत धडधड, अस्वस्थता होत नाही.
 • भूक लागते; पण जेवायची इच्छा होत नाही अशा वेळी मोसंबीचा रस मीठ, जीरं आणि ओव्यासोबत घोट घोट घेतल्याने तोंडाला चव येते.
 • पित्ताची प्रकृती किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी मोसंबीचा वापर अधिक करणं चांगलं.
 • पचनशक्ती सुधारते.
 • मोसंबी खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.
 • मलावरोधाची तक्रार असल्यास जेवणानंतर मोसंबी सेवन करावं ही तक्रार दूर होते.
 • गॅसेसची समस्या असल्यास मोसंबीच्या रसात मिरपूड टाकून तो रस प्यावा.
 • वाळलेल्या मोसंबीच्या सालीचे चूर्ण केसांना लावल्याने केस दाट आणि मुलायम होतात.

श्रवण. आर व डॉ. डी. एम. शेरे
अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

sweet lime मोसंबी vitamin c जीवनसत्व 'क' citrus लिंबूवर्गीय Juice रस

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.