1. आरोग्य सल्ला

आरोग्यवर्धक बहुगुणी गाजर

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वता:कडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच डोळ्यांचे आणि पोटाचे विकारसुद्धा दूर होतात.

KJ Staff
KJ Staff


आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वता:कडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच डोळ्यांचे आणि पोटाचे विकारसुद्धा दूर होतात.

गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद, इंग्रजीमध्ये कॅरट, लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिफेरी या कुळातील आहे.

गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो. देशी गाजरे ही चवीने खूप गोड व पौष्टिक असतात. विलायती गाजरे ही चवीने फिकट व पाणीदार असतात. गाजरामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, अ, ब, क जीवनसत्त्व असते. त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतुमय व पिष्टमय घटकही असतात. गाजरामध्ये ‘कॅरोटिन’ हा घटक विपुल प्रमाणात असतो. त्यामुळेच गाजराचा मुरंबा, कोशिंबीर, सॅलेड, खीर, भाजी, सूप केक, भात, गाजराचा हलवा, गाजराची चटणी, गाजराचा चिवडा, गाजराची पुरी, गाजराची खीर अशा अनेक प्रकारांमधून आहारात गाजराचा वापर नियमित करावा. त्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांमुळे शरीराला शक्ती व ऊर्जा मिळते.

गाजरामुळे शरीराला नेमके कोणते फायदे होतात याबाबत आपल्याला म्हणावी तितकी माहिती नसते. कधी गाजर हलवा आवडतो म्हणून तर कधी ताटात वाढले म्हणून इतकेच गाजर खाल्ले जाते. मात्र गाजराचा आहारात नियमित समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. शक्तीवर्धक म्हणूनही गाजर उपयुक्त असते.

पाहूयात काय आहेत गाजराचे आरोग्यदायी फायदे….

  • गाजरामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय गाजरात असणारे बिटा कॅरोटिन कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.
  • साधारणपणे आपल्याकडे बाजारात गाजर सहज उपलब्ध होते. गाजराची पाने आपण खात नाही. पण गाजरापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात लोह असते. त्यामुळे एनिमिया दूर होतो.
  • गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांच्या आहारात गाजर असायलाच हवे. तसेच ज्यांना नाही त्यांनीही नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.
  • गाजराचा ज्यूस आपल्या शरीरातून जीवनसत्त्व ए आणि ई ची कमतरता दूर करते. जर याची शरीरात कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा, केस तुटणे, नखे खराब होते अशा समस्या होतात. जीवनसत्त्व ए आपल्या शरीराचे हाड आणि दातांसाठी देखील फायदेशीर आहे. हे डोळ्यांची कमकुवतता दूर करते यासोबतच त्वचा आणि केसांना निरोगी आणि चमकदार ठेवते.
  • गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यापासुन आराम मिळतो.
  • एक ग्लास गाजरच्या रसामध्ये एक कप कारल्याचा रस टाकून प्यायल्याने डायबिटीजपासुन लाभ मिळतो.
  • डायबिटीजच्या रोग्यांसाठी गाजर अमृत समान आहे. एक ग्लास गाजरच्या रसामध्ये एक कप कारल्याचा रस टाकून प्यायल्याने डायबिटीजपासुन लाभ मिळतो. एक ग्लास गाजराच्या रसामध्ये अर्धा कप आवळ्याचा रस टाकून दिवसातून दोन तीन वेळा प्यायल्याने डायबिटीजची समस्या दूर होते.
  • जे पुरुष अशक्तपणामुळे त्रस्त असतात त्यांच्यासाठी गाजराचा ज्यूस खुप फायदेशीर असते. चिकित्सा अध्ययनांमध्ये सिध्द झाले आहे की, गाजर कँसरचा धोका कमी करते. गरोदर महिला आणि होणाऱ्या बाळासाठी ज्यूस खुप फायदेशीर असते.
  • नियमित गाजराचा ज्यूस प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते.
  • गाजर चावून खाल्यामुळे तोंडामध्ये लाळ अधिक प्रमाणात सुटते व त्यामुळे घेतलेले जेवण व्यवस्थित पचते म्हणून जेवण करण्यापूर्वी सॅलेडमध्ये गाजर अवश्य खावे.
  • गाजराचे बी हे आकाराने लहान, भुरकट रंगाचे सुवासिक, शक्तीवर्धक, मूत्राशयाचे विकार दूर करणारे व गर्भाशयाच्या वेदनांवर व विकारांवर उपयोगी आहे. गाजर वाफवून त्याचे पोटीस करून शरीरावरील बेंडावर लावल्यास बेंड फुटून जखम लवकर बरी होते.

अनु. क्र.

पोषक तत्वे

प्रमाण

उर्जा (कि.कॅ)

160

2

प्रथिने (ग्रॅ)

1.04

3

स्निग्ध पदार्थ (ग्रॅ)

0.47

तंतुमय पदार्थ (ग्रॅ)

4.49

कर्बोदके (ग्रॅ)

6.71

6

कॅल्शिमअम (मि.ग्रॅ)

75

7

लोह (मि.ग्रॅ)

2.23

मॅग्नेशिअम (मि.ग्रॅ)

9.0

सोडीअम (मि.ग्रॅ)

11.0

10 

पोटॅशिअम (मि.ग्रॅ)

230

11

झिंक (मि.ग्रॅ)

0.24

12 

कॅरोटीन (मि.ग्रॅ)

2706

13 

थायमिन (मि.ग्रॅ)

0.04

14

रायबोफ्लेविन (मि.ग्रॅ)

0.03

15 

नायसिन (मि.ग्रॅ)

0.25

16 

फॉलिक एसिड (मि.ग्रॅ)

23.67

संदर्भ: राष्ट्रीय पोषण संस्थान (NINHyderabad)


श्री. गणेश गायकवाड, प्रा. डॉ. ए. आर. सावते
(अन्न व अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, व. ना. म. कृ. वि, परभणी)
9850236380


English Summary: Healthy Carrots Published on: 15 April 2019, 04:09 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters