
कॅनोला तेल म्हणजेच “मोहरीचे तेल”. कॅनोलाचे वैज्ञानिक नाव “ब्रैसिका नेपस” असे आहे. कॅनोला तेल गेल्या अनेक दशकांपासून आरोग्य चांगले राखण्यासाठी हितकारक मानले जाते आणि लोक त्याचा वापरही करतात. या तेलामध्ये अल्फा-लिनोलेईक अॅसिड आणि लिनोलेईक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. “ओमेगा-3 आणि ओमेगा-6” फॅटी अॅसिड आरोग्यासाठी फायदेशीर असते. कॅनोला तेलाचा वापर अन्न शिजवण्यासाठी आणि केस तसेच त्वचा यांचे आरोग्य राखण्यासाठी होतो. त्याशिवाय हे तेल अनेक आजार दूर ठेवण्यासाठीही खूप प्रभावी आहे.
कॅनोला तेलाचे फायदे:
- हृदयाचे आरोग्य
कॅनोला तेल हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असते. या तेलात कमी प्रमाणात संपृक्त चरबी असते ज्यामुळे हृदय स्वस्थ राहाते. त्याशिवाय यात फॅटी अॅसिड आणि स्टीरॉल असते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते. त्यात कोलेक्ट्रॉल नसते आणि कॅनोला तेलामध्ये आढळून येणारे फाईटोस्टीरॉल जेवणातील कोलेस्ट्रॉल शोषून घेणे आणि त्याची निर्मिती करण्यापासून रोखते. - कर्करोगाचा धोका कमी होतो
कॅनोला तेलामुळे कर्करोगाची जोखीम कमी होण्यास मदत होते. या तेलात असलेले “ई-जीवनसत्व” कर्करोगापासून बचाव करते. - रक्तशर्करेची पातळी कमी होते
कॅनोला तेल रक्तातील शर्करेचे नियंत्रण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. कॅनोला तेलामध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस असते. त्यामुळे रक्त शर्करा तसेच इन्सुलीनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. - स्मरणशक्ती योग्य राखते
मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वय वाढताना स्मरणशक्ती कमजोर होण्याची समस्याही दूर होते. - ऊर्जा पातळीत वाढ होते
कॅनोला तेलाचे सेवन केल्याने शरीराचे मेटाबोलिझम म्हणजेच चयापचय सुधारते. कॅनोला तेलात असलेले अॅटीऑक्सिडंटमुळे ऊर्जेची पातळी वाढते. - शरीराची सूज कमी होते
कॅनोला तेल शरीराची सूज कमी करते. त्याशिवाय अस्थमा आणि आथ्रायटिस सारख्या आजारांच्या उपचारातही मदत करते. कॅनोला तेल सांध्यांचे कार्य व्यवस्थित होण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
- त्वचेचे आरोग्य
कॅनोला तेलाचा वापर त्वचा आरोग्यदायी रहावी म्हणूनही उपयोग करता येऊ शकतो. या तेलात फॅटी अॅसिड असतात त्यामुळे त्वचेला मॉश्चराईझ करते. आणि त्वचेचे पोषण मिळते. त्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. कॅनोला तेलाचा वापर त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि त्वचेचा संसर्ग दूर होण्यास मदत होते. या तेलामध्ये “ई-जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट” असतात ज्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते. - केसाचे आरोग्य
कॅनोला तेलामुळे केस आणि डोक्याच्या त्वचेला पोषण मिळते आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. कॅनोला तेल केसाच्या मुळाशी पोहोचते आणि केसाचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होते आणि केस सुंदर चमकदार, आरोग्यपूर्ण होतात. या तेलामुळे केस तुटत नाही आणि केस वाढण्यास मदत होते. अन्य तेलांच्या तुलनेत कॅनोला तेल केसासाठी नक्कीच उपयुक्त आहे.
लेखक:
श्री. एस.डी. कटके, प्रा. डॉ. के.एस. गाढे
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)