1. आरोग्य सल्ला

आरोग्यदायी बीट

आरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते.

KJ Staff
KJ Staff


आरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. बीट हा लोह, जीवनसत्व, फॉलिक एसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटिऑक्सिडेंटस (विशेषतः बीटागीन) शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटॅमिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.

प्राचीन काळापासून, बीटरूटचा वापर इतर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टी सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलिक एसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. बीटचे कोशिंबीर आणि सूप बनविण्याव्यतिरिक्त, हे सँडविच मधे इतर भाज्यांबरोबर वापरले जाऊ शकते.

चला तर मग आपण जाणून घेऊया बीटचे फायदे आणि आरोग्यासाठी बीटचे घरगुती उपाय.

  • ब्लड शुगर लेवल कमी करते
    बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्राट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. हे दोन्ही गुण धमन्यांना रुंद करण्यात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार प्रत्येक दिवशी 500 ग्रॅम बीट खाल्ल्याने 6 तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते.

  • कॉलेस्ट्रॉल कमी करतो
    बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. बीटासायनिनमुळेच बीटाचा रंग लाल-जांभळा असतो. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडेंट आहे. हे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते धमन्यांमध्ये जमा होत नाही. यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतो.

  • गर्भवती महीलांना फायदेशीर
    बीटमध्ये उच्च प्रमाणात फॉलिक एसिड असते. हे गर्भवती महीला आणि त्याच्या होणाऱ्या बाळासाठी महत्त्वाचे आहे. गर्भवती महीलांना यामुळे अतिरिक्त उर्जा मिळते.

  • आस्टिओपरोसिस पासुन बचाव
    बीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. यामुळे दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या दुसऱ्या समस्या होणार नाही.

  • डायबिटीज वर नियंत्रण
    ज्या लोकांना डायबिटीज आहे ते बीट खाऊन त्यांची गोड खाण्याची इच्छा पुर्ण करु शकता. हे खाण्याचा फायदा होतो कारण यामुळे गोड खाण्याच इच्छा पुर्ण होते आणि ब्लड शुगर लेवलसुध्दा वाढत नाही, कारण यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि हे फॅट फ्री असते. डायबिटिजच्या रुग्णासाठी हे चांगले औषध आहे.

  • एनीमिया
    हा एक समज आहे की, बीटाचा रंग लाल असल्यामुळे हे रक्त वाढवण्यास फायदेशीर असते, आणि यामुळे हे एनीमिया मध्ये जास्त खाल्ले पाहीजे. या समजमध्ये थोडी सत्यता आहे. बीट मध्ये मोठ्या प्रमाणात आयर्नमुळे हिमोग्लोबिन बनते, जे रक्ताचा असा भाग असतो की, जे ऑक्सिजन आणि अनेक पोषक तत्त्वांना शरीराच्या दुसऱ्या अंगापर्यंत पोहचवण्यास मदत करतो. बीट मधील हेच आयर्न तत्त्व एनीमिया पासुन लाढण्यास मदत करता.

  • थकवा दुर करते
    एका संशोधनात सिध्द झाले की, बीट थकवा दुर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमिन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपुर्ण शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमात मिळते आणि एनर्जी वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

  • सेक्शुअल हेल्थ आणि स्टॅमिना वाढवते
    बीटला नैसर्गिक वियाग्रा म्हटले जाते. जुन्या काळात याचा उपयोग यौन स्वास्थ वाढवण्यासाठी केला जात होता. बीटा नायट्रिक ऑक्साइड रिलीज करते ज्यामुळे रक्त वाहीन्यांचा विस्तार होतो आणि जेनेटल्समध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो. या व्यतिरिक्त बीटमध्ये मोठ्या प्रमाणात बोरॉन केमिकल असते, जे ह्युमन निर्मितीसाठी मदत करते. यामुळे पुढच्या वेळेस वियाग्रा घेण्याचा विचार करत असाल तर पहीले बीट ट्राय करा.

  • कँसरसाठी फायदेशीर
    बीटचे बीटासायनिन तत्त्व अजुन एक चांगले आणि महत्त्वाचे काम करते. एका संशाधनात सिध्द झाले की, ज्या लोकांना ब्रेस्ट किंवा प्रोस्टेट कँसर होतो, त्यांनी बीट खाल्ले तर त्यांचा ट्यूमर वाढण्याची गती 12.5 टक्के कमी होते.

  • बध्दकोष्ठ
    बीटमध्ये फायबर असते, यामुळे हे एक रोचक औषधीचे काम करते. यामध्ये नायट्रेट तत्व असतात. यामुळे स्टूल नरम होतात. सोबतच पोटाच्या सर्व टॉक्सिन्स निघुन जातात.

  • बुध्दी चपळ होते
    बीटचा ज्यूस प्यायल्याने व्यक्तिचा स्टॅमिना 16 टक्क्यांनी वाढतो. असे याच्या नायट्रेट तत्त्वामुळे होते. शरीरातील ऑक्सिजन वाढल्यामुळे मस्तिष्क सुध्दा योग्या प्रकार काम करते.

साखरे के. एस, डॉ. अ. र. सावते व डॉ. रा. ब. क्षिरसागर
(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)
8805486988

English Summary: Healthy Beet root Published on: 22 May 2019, 10:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters