Health Tips: मित्रांनो अजूनही राज्यात उन्हाचा प्रकोप कायम आहे. राज्यातील जनता उकाड्याने अक्षरशः हैराण झाली आहे. या उन्हाच्या दिवसात उसाचा रस पिणे स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात अनेकांचे आवडते पेय म्हणजेचं उसाचा रस. हा रस चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला गेला आहे. अनेक लोक दिवसातून तीन ते चारदा उसाचा रस सेवन करत असतात.
यामुळे उकाड्यापासून आराम मिळतो तसेच शरीराला थंडावा मिळतो पण काही लोकांनी हे पेय सेवन केल्याने त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे आज आपण कोणत्या लोकांनी उसाचा रस सेवन करू नये. याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रानो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी.
उसाचा रस पिल्याने होणारे साइड इफेक्ट्स
»मित्रांनो खरं पाहता उसाचा रस आपल्या शरीरासाठी खूपच फायद्याचा आहे. मात्र बाहेर मिळतं असलेल्या उसाच्या रसावर अनेक प्रकारच्या माश्या फिरत असतात. अशा परिस्थितीत उसाचा रस प्यायल्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. त्याच वेळी, जर तुम्हाला आधीच अन्नातून विषबाधा होत असेल, तर उसाचा रस घेणे टाळावे असा सल्ला आरोग्य तज्ञ देत असतात.
»हृदयरुग्णांसाठीही उसाचा रस फायदेशीर मानला जात नाही. त्यामुळेच अशा व्यक्तींना उसाचा रस न पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे जर तुम्हाला देखील हृदयसंबंधित काही विकार असतील तर तुम्ही देखील उसाचा रस घेणे टाळावे.
»उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने दातांना त्रास होऊ शकतो. दातांना कैविटीसारखा विकार देखील उसाच्या रसामुळे होऊ शकतो. म्हणून ज्या व्यक्तींना दातासंबंधित विकार असतात त्या लोकांनी उसाचा रस घेणे टाळावे.
»जर तुम्हाला रक्तातील साखरेचा त्रास होत असेल तर उसाचा रस पिऊ नका. यामुळे तुमची समस्या खूप वाढू शकते.
»याशिवाय जुलाबाची तक्रार असल्यास किंवा अपचनाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी उसाचा रस पिऊ नये असा सल्ला आहार तज्ञ वारंवार देत असतात.
Share your comments