Health Tips: मित्रांनो भेंडी (Okra) ही एक अशी भाजी आहे जी क्वचितच लोकांना आवडत नाही. तुम्हीही भेंडीचे (Ladyfingers) चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो भेंडी आपल्या आरोग्यासाठी (Health) खूपच फायदेशीर आहे. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म (Health Benifits) केवळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीच (Diabetic Patients) नाही तर कर्करोग असलेल्या लोकांसाठी (Cancer Patients) देखील फायद्याचे आहे.
भेंडीच्या सेवणाने (ladyfinger benifits) मधुमेह आणि कर्करोग कायमचा बरा होत असल्याचा दावा केला जात आहे. मित्रांनो भेंडीला सुपरफूड मानले जाते हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. कारण त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, फॉलिक एसीड आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. त्यात कॅलरी कमी आणि फायबर भरपूर असते.
मधुमेहामध्ये भेंडी फायदेशीर आहे
संशोधनात असे दिसून आले आहे की, जर कोणाचा मधुमेह सुरुवातीच्या टप्प्यावर असेल तर भेंडीचा अशा लोकांना खूप फायदा होणार आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक भेंडीचे पाणी प्यायले आहेत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते. तुर्कस्तानमध्येही, मधुमेहावर उपचार करण्यासाठी शतकानुशतके भाजलेली भेंडी वापरली जात आहे.
भेंडीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते
संशोधनात असे आढळून आले आहे की मधुमेह असलेल्या लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल असण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी एंटीऑक्सीडेंट आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले. मधुमेहाची गुंतागुंत कमी करण्यासाठी आरोग्य चांगले राखणे आवश्यक आहे.
भेंडीमध्ये भरपूर फायबर असते
भेंडीमध्ये भरपूर फायबर असते, जे मधुमेहाच्या उपचारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. उच्च फायबर सामग्रीमुळे ते मधुमेहविरोधी अन्न देखील मानले जाते. भेंडी रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. भेंडी उत्तम ग्लायसेमिक नियंत्रणास प्रोत्साहन देते आणि इंसुलिन संवेदनशीलता सुधारते. भेंडी केवळ मधुमेहासाठीच नाही तर अपचनासाठी, भूक कमी करण्यासाठी आणि दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
भेंडीमध्ये एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात
भेंडीमध्ये एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तणावाची पातळी कमी होते. मधुमेहामध्ये आहारासोबतच आपली जीवनशैलीही महत्त्वाची असते. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी तणावावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
आहारात भेंडीचा समावेश कसा करावा?
भेंडी बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यात कांदे आणि टोमॅटो कापून टाकुन देखील तयार करता येते. भेंडी कापून रात्रभर पाण्यात बुडवून ठेवा, सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावे. तुम्ही भेंडीच्या बियांची पावडरही वापरू शकता.
Share your comments