भारतीय स्वयंपाक घरात हिंग हा एक महत्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. हिंगाची चव जेवणाची चव वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा पदार्थ आहे. हिंगला असलेला तीव्र आणि तिखट वास अन्नाचा सुगंध तसेच चव वाढवतो. हिंग फक्त अन्नाची चव वाढवतो असे नाही तर, ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. हिंग पोटासाठी अमृत मानले जाते. हिंगाचा उपयोग विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. हिंग श्वसनाच्या आजारांवर मात करण्यास तसेच घशाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. एवढंच नाही तर हिंगामध्ये महिलांच्या पचनाच्या समस्या आणि मासिक पाळीच्या समस्या दूर करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो.
याशिवाय इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) वर उपचार करण्यासाठी हिंगाचा वापर केला जाऊ शकतो. मित्रांनो आपण हिंगचे सेवन अन्नामध्ये टाकून अनेकदा केले असेल मात्र तुम्ही दुधात हिंग टाकून कधी सेवन केले आहे का? कदाचित तुमचे उत्तर नाही असणार. पण मित्रांनो दुधात हिंग टाकून सेवन केल्यास आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात हेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी.
महत्वाच्या बातम्या:
सावधान! जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने आरोग्यावर होतात 'हे' घातक परिणाम
पाचन क्रिया सुधारते
हिंग आणि दुधाचे सेवन केल्याने मानवाची पचनक्रिया सुधारत असल्याचा आयुर्वेदात दावा केला गेला आहे. मित्रांनो रोज रात्री कोमट दुधात 1 चिमूट हिंग मिसळून या दुधाचे सेवन करा. दररोज हिंग मिसळलेल्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला मोठा फायदा होतो. यामुळे पचनसंस्था दुरुस्त होतं असते. एखाद्या व्यक्तीला जर गॅस किंवा अॅसिडिटीचा अधिक त्रास होत असेल तर दिवसातून दोनदा या मिश्रणाचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.
कानाचा त्रास दूर होतो
कानाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील दूध आणि हिंग यांचे मिश्रण वापरले जाते. यासाठी शेळीच्या दुधात थोडी हिंग मिसळून या दुधाचे काही थेंब दोन्ही कानात टाकण्याचा सल्ला दिला जातो. हे दुध कानात टाकले असल्यास सकाळी कापसाच्या साहाय्याने कान स्वच्छ करून घ्यावे. यामुळे कान दुखण्यापासून आराम मिळतो. यासोबतच संसर्गासारख्या समस्याही दूर होऊ शकतात.
उचकीसाठी रामबाण
दूध आणि हिंगाचे सेवन केल्याने उचकीच्या समस्येपासून आराम मिळतो. विशेषतः जर तुम्हाला वारंवार उचकी येत असतील तर दुधात हिंग मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
बद्धकोष्ठतेपासून आराम
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी दूध आणि हिंगाचे सेवन केले जाऊ शकते. हे तुमचे स्टूल सैल करू शकते. त्यामुळे मल पास करणे सोपे होते. यासोबतच हे पोट फुगणे कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
Share your comments