सध्या देशात सर्वत्र उन्हाळी ऋतू सुरु असून यावर्षी तापमानात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. नेहमीच उन्हाच्या आगमनाबरोबर भाजीपाल्याची मागणी वाढत असते. या दिवसात कारल्याची देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. खरं पाहता, कारले चवीला कडू असल्यामुळे, बहुतेकांना तो आवडत नाही, परंतु जर आपण कारल्याच्या फायद्याबद्दल बोललो तर ते मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारल्याचा ज्युस विशेषता मानवी आरोग्यासाठी खूपच उत्तम असतो.
कारले ही जगातील सर्वात आरोग्यदायी भाज्यांपैकी एक आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळत असतात, यामुळे याचे सेवन मानवी आरोग्याला विशेष लाभप्रद सिद्ध होत असते. कारले हे भाजी बनवून लोणचे किंवा रस बनवून सेवन केले जाऊ शकते. कारल्याचे दररोज सेवन केल्याने मानवी आरोग्याला त्याचे फायदे होतात. याचा ज्यूस आरोग्या साठी फायदेशीर असल्यामुळे अनेक लोक याचे सेवन करत असतात. कारल्याचा ज्यूस पिल्याने रक्तदाब कमी होतो आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारत असते.
साखरेची पातळी कमी करत असते-मधुमेहाच्या रुग्णाला एक चतुर्थांश कप कारल्याचा रस, एक कप गाजराच्या रसात मिक्स करून द्यावा. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. कारल्याचा रस सकाळी पिणे खूप फायदेशीर ठरते. कारल्यामध्ये कॅरेटिनसारखे अँटी-हायपर ग्लायसेमिक घटक आढळतात.
भूक वाढण्यास मदत करते-जर एखाद्या व्यक्तीला भूक न लागण्याची समस्या असेल तर त्याच्यासाठी कारल्याचे सेवन फायदेशीर ठरेल. वास्तविक, भूक न लागल्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे रोज कारल्याचा रस प्यायल्याने किंवा कारल्याची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया बरोबर राहते, त्यामुळे भूक वाढते.
त्वचेच्या आजारांवरही फायदेशीर- मित्रांनो आम्ही सांगू इच्छितो की, कारल्यामध्ये असलेले कडू आणि अल्कलॉइड घटक रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. कारल्याची भाजी खाल्ल्याने तसेच कारले मिक्सरमध्ये बारीक करून रात्री हात-पायांवर लावल्याने फोड, पुरळ, त्वचारोग यांसारख्या समस्या नाहीशा होतात. कारल्याच्या रसात, लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने दाद, खरुज, खाज, सिरोसिस यांसारख्या त्वचारोग देखील दुर राहण्यास मदत होत असते.
Share your comments