1. आरोग्य सल्ला

Dengue Fever Update : आरोग्यवार्ता! डेंग्यू झाल्यावर रुग्णांना काय आहार द्यावा?

डेंग्यू तापावर उपचार करणे तसे कठीण आहे. खूप ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी इत्यादी आणि काही प्रकरणांमध्ये जीव देखील जाऊ शकतो. परंतु चांगला आहार घेतला तर तुम्ही लवकर बरे होता. रुग्णाला डेंग्यूशी लढण्यास आणि लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.

Dengue Fever Update

Dengue Fever Update

Recovery Foods for Dengue Fever : वातावरणात बदल झाला की आजार वाढतात. असाच एक आजार म्हणजे डेंग्यू. डेंग्यू झाल्यावर रुग्णाला खूप जास्त प्रमाणात ताप येतो. अंग पूर्ण पणे दुखते. रुग्णाला अशक्तपणा जाणवतो. यामुळे यातून लवकर बरे होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो तो म्हणजे आहार. तर चला मग डेंग्यू झाल्यावर आहार कसा असावा? काय खावे? हे जाणून घेऊ.

डेंग्यू तापावर उपचार करणे तसे कठीण आहे. खूप ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी इत्यादी आणि काही प्रकरणांमध्ये जीव देखील जाऊ शकतो. परंतु चांगला आहार घेतला तर तुम्ही लवकर बरे होता. रुग्णाला डेंग्यूशी लढण्यास आणि लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.

डेंग्यू झाल्यावर लिंबूवर्गीय फळे अर्थात किवी याशिवाय हिरव्या पालेभाज्या, हळद, आले, लसूण, तेलकट मासे जसे सॅल्मन किंवा सार्डिन, नट आणि बिया अशा फुड्समध्ये समावेश होतो. हे पदार्थ आहारातून आवश्यक पोषक तत्वे देतात. यामुळे रुग्णाला आजारातून बाहेर पडण्यास मदत होते. आणि डेंग्यूशी लढण्याकरता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

घरगुती उपाय काय?
डेंग्यू झाल्यावर सगळ्यांत प्लेटलेट (पेशी) वाढवण्याचं टेन्शन सगळ्यांना असते. मग सुरू होतात घरगुती उपाय. यात मध, आले-तुळस पाने रस, पपईच्या पानांचा रस करुन रुग्ण पेशी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात.

डेंग्यू लक्षणे:
१.अचानक थंडी-ताप येणे.
२.डोकेदुखी आणि अंगदुखी.
३. हाडे आणि सांधे दु:खी
४. उलटी
५. अंगावर रॅश येणं

English Summary: Health news What should be given to patients after dengue Published on: 04 December 2023, 04:48 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters