Health News: अनेकदा आजरी (sick) असल्यास तुमच्या जिभेची चव (Taste of the tongue) जात असेल. काहीही खाल्ले तरीही तुम्हाला त्याची चव कळत नाही. मात्र आजारी पाडण्याअगोदर तुमची जीभ (tongue) अगोदरच संकेत देत असते. अनेकदा तुम्ही जिभेचा रंग (Color of the tongue) बदलल्याचा पहिला असेल. हेच रंग तुम्हाला आरोग्याविषयी माहिती देत असतात.
तुमच्या जिभेचा रंग तुमच्या आरोग्याविषयी (Health) बरेच काही सांगून जातो. आपली जीभ नेहमीच गुलाबी नसते. जेव्हा तुम्ही कोणत्याही आजाराशी झुंज देत असता तेव्हा तुमच्या जिभेचा रंगही बदलतो.
जर तुमच्या जिभेचा रंग बराच काळ बदलत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया जिभेचा रंग तुमच्या आरोग्याविषयी काय सांगतो.
1. गुलाबी
जीभ गुलाबी असेल आणि तिच्यावर पांढरा लेप असेल तर ते नैसर्गिक आणि निरोगी जिभेचे लक्षण आहे.
2. पांढरा किंवा राखाडी
आपल्या जिभेवर सहसा पांढरा थर असतो, परंतु जर तुमची जीभ सामान्य दिवसांपेक्षा जास्त पांढरी असेल किंवा काही भाग धूसर दिसत असेल तर त्यामागे शरीरात यीस्ट इन्फेक्शन असू शकते. जर तुम्हाला ल्युकोप्लाकियाचा त्रास होत असेल तर जीभेवर पांढरे डाग देखील दिसू शकतात, जे बर्याचदा धूम्रपान किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होते.
3. जांभळा
जर तुमच्या जिभेचा रंग जांभळा असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण नीट होत नाही. फुफ्फुस किंवा हृदयाशी संबंधित विविध समस्यांमुळे रक्त परिसंचरण खराब होऊ शकते. जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होत असेल तर तुम्हाला दीर्घकाळ जांभळी जीभ दिसेल.
भाजीपाल्याचे दर कडाडले! आवक घटल्याने दरात वाढ
4. लाल
गडद लाल जीभ अनेकदा सुजलेली आणि उठलेली दिसते, जी वैद्यकीयदृष्ट्या 'स्ट्रॉबेरी जीभ' म्हणून ओळखली जाते. हे सहसा रक्त विकार किंवा हृदयाच्या समस्यांकडे निर्देश करते. याशिवाय, हे व्हिटॅमिन-बी ची कमतरता किंवा स्कार्लेट तापाचे लक्षण देखील असू शकते.
5. पिवळा
पिवळ्या हीभेचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या आहेत. जर तुम्हाला पचन किंवा वायूचा त्रास होत असेल तर तुमच्या जीभेचा रंग पिवळा होऊ शकतो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पिवळी जीभ हे टाइप 2 मधुमेहाचे लक्षण असू शकते. याशिवाय, पिवळी जीभ हे कावीळ किंवा खराब तोंडी आरोग्याचे लक्षण देखील असू शकते.
महत्वाच्या बातम्या:
शासनाचा अजब कारभार! चक्क येड्या बाभळीच्या झुडपात लावलंय पर्जन्यमापक यंत्र
लातूरमध्ये तब्बल १ लाख लाभार्थी ई-केवायसीविनाच! मुदत संपत आली तरीही शेतकऱ्यांची ई-केवायसीकडे पाठ
Share your comments