आजचे युग हे स्मार्टफोनचे युग म्हणुन ओळखले जात असले तरी पण घरी येताच आपले लक्ष सर्वप्रथम पडते ते टीव्हीकडे. टीव्ही पाहणे हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे.
पण असे असले तरी आम्ही आपणांस सांगू इच्छितो की जर तुम्ही जास्त वेळ टीव्ही पाहत असाल तर त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. होय, खरंच! नुकतेच एक संशोधन समोर आले आहे, ज्यानुसार जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने हृदयाची समस्या उद्भवू शकते. आपण आपल्या आजच्या या लेखात याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत.
आज या लेखाद्वारे आपण जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने हृदयावर कसा विपरीत परिणाम होतो याविषयी जाणुन घेणार आहोत.
हे संशोधन केंब्रिज विद्यापीठ आणि हाँगकाँग विद्यापीठाच्या एका टीमने केले आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की जर एखादी व्यक्ती दररोज नियमितपणे 1 तासापेक्षा कमी टीव्ही पाहत असेल, तर त्यांच्यापैकी 11% लोकांना हृदयविकाराचा त्रास होतो. म्हणजेच रोगाचा धोका टाळता येतो.
Health Benifits: विवाहित पुरुषांसाठी केळीचे सेवन ठरणार रामबाण; वाचा केळी खाण्याचे जबराट फायदे
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर एखादी व्यक्ती जास्त वेळ बसून राहिली आणि शारीरिक हालचालींपासून दूर राहिली तर हृदयविकाराचा धोका वाढू लागतो.
संशोधकांनी यूके बायोबँकचा डेटा शेअर केला आहे, त्यानुसार स्क्रीनवर दीर्घकाळ बसल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील शारीरिक हालचालीचं कमी होत नाहीत तर शरीरातील कोरोनरी हृदयरोगाचा धोका देखील वाढू शकतो.
संशोधन कसे झाले?
प्रत्येकी 5 दशलक्षाहून अधिक लोकांच्या पॉलीजेनिक जोखीम स्कोअरचे संकलन करून, संशोधकांना असे आढळून आले की जे लोक नियमितपणे 4 तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहतात त्यांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो.
तर जे लोक दिवसातून दोन ते तीन तास टीव्ही पाहतात त्यांच्यात हृदयविकार होण्याचे प्रमाण ६% पर्यंत कमी होते. त्याच वेळी, 1 तासापेक्षा कमी टीव्ही पाहणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण 16% कमी होते.
आरोग्यासाठी गाईचे तूप अधिक फायद्याचे का म्हशीचे; वाचा काय आहे यावर तज्ञांचे मत
Share your comments