1. आरोग्य सल्ला

काळ्या तांदळाचे सेवन आहे आरोग्यासाठी फायदेशीर

आपल्याकडे आहारात बरेच जण भाताचा वापर करतात. त्याच प्रमाणे आपल्या रोजच्या जेवणातही भाताचा समावेश मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. परंतु आपण आहारामध्ये पांढऱ्या तांदळाचा समावेश करतो कधी कधी त्याचं अतिसेवन आरोग्याला नुकसानदायी ठरू शकतो. जर तुम्हाला यापासून बचाव करायचा असेल तर आहारामध्ये काळ्या तांदळाचा समावेश करणे फायदेशीर असते. या लेखात आपण काळा तांदळाचे आरोग्याला होणारे फायदे याविषयी जाणून घेऊ.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
black rice

black rice

 आपल्याकडे आहारात बरेच जण भाताचा वापर करतात. त्याच प्रमाणे आपल्या रोजच्या जेवणातही भाताचा समावेश  मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. परंतु आपण आहारामध्ये पांढऱ्या तांदळाचा समावेश करतो कधी कधी त्याचं अतिसेवन आरोग्याला नुकसानदायी ठरू शकतो. जर तुम्हाला यापासून बचाव करायचा असेल तर आहारामध्ये काळ्या तांदळाचा समावेश करणे फायदेशीर असते. या लेखात आपण काळा तांदळाचे आरोग्याला होणारे फायदे याविषयी जाणून घेऊ.

  • हृदया संबंधित आजारांमध्ये फायदेशीर :हृदय रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी काळा तांदूळ वरदान ठरतो. संशोधनानुसार काळात आंधळा मध्ये अँथोसायनिन तत्व आढळून येते. धमन्यांमधून रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
  • अल्झायमर, डायबिटीज आणि कॅन्सर वर फायदेशीर : डायबिटीज, अल्झायमर या व्यतिरिक्त कमजोर असणाऱ्या लोकांसाठी काळा तांदूळ सेवण करणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी हा तांदूळ उपयोगी ठरू शकतो.
  • प्रोटीन आणि आयर्न मुबलक प्रमाणात : काळ्या तांदळामध्ये दुसऱ्या तांदळाच्या  तुलनेत सर्वाधिक प्रोटीन असते. तसेच यामध्ये आयएनजी मात्रा ही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो.
  • ब्रेस्ट कॅन्सर : काळे तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येतात. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून सुटका होते. त्याचबरोबर शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करून प्लॅस्टिक यांच्यासारख्या आजारापासून बचाव होतो.
  • शरीरात सूज:काळ्या तांदळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे लिव्हर ला येणारी सूज आणि वेदना पासून सुटका मिळते.
  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी: काळ्या तांदळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

 

  • एंटीऑक्सीडेंट : हे तांदूळ गडद रंगाचे आहेत. यातील एंटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे याचा रंग गडद असतो ते आपल्या त्वचा, मेंदू आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.
  • शरीर साफ करणारे : अभ्यासात सिद्ध झाले आहे की काळ्या तांदळाचे सेवन शरीरातून हानीकारक आणि नको असलेले तत्वांना बाहेर फेकून आंतरिक सफाई मध्ये मदत करते. हे लिव्हरला स्वच्छ करण्यातही मदत करते.

 

English Summary: health benifit of black rice Published on: 28 June 2021, 02:06 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters