1. आरोग्य सल्ला

कारले आहे कडू पण आहे आरोग्यासाठी फायदेशीर

आरोग्यासाठी सर्व प्रकारचा भाजीपाला हा तसा लाभदायक आहे. या सगळ्या भाजीपाल्यामध्ये उठून दिसणारे आणि आपल्याकडे आकर्षित करणारे कारलं जरी चवीने कडू असले तरी त्यापासून आरोग्याला मिळणारे फायदे हे नक्कीच गोडवा देणारे आहेत. तर या आरोग्यपूर्ण कारल्याचे आरोग्यदायी गुणधर्म या लेखात जाणून घेऊ. कारल्याचे आरोग्यदायी फायदे 1- कारण यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्यामुळे एक कप, बद्धकोष्टता आणि पचनास संबंधित समस्या दूर करतो. कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. 2- ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे अशा कारले खूपच फायदेशीर ठरते. दम्याच्या आजारामध्ये कारल्याची भाजी काहीही मसाले न वापरता देखील बनवून खाल्ल्याने फायदा होतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
bitter gourd

bitter gourd

  आरोग्यासाठी सर्व प्रकारचा भाजीपाला हा तसा लाभदायक आहे. या सगळ्या भाजीपाल्यामध्ये उठून दिसणारे आणि आपल्याकडे आकर्षित करणारे कारलं जरी चवीने कडू असले तरी त्यापासून आरोग्याला मिळणारे फायदे हे नक्कीच गोडवा देणारे आहेत. तर या  आरोग्यपूर्ण कारल्याचे आरोग्यदायी गुणधर्म या लेखात जाणून घेऊ.

     कारल्याचे आरोग्यदायी फायदे

  • कारण यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्यामुळे एक कप, बद्धकोष्टता आणि पचनास संबंधित समस्या दूर करतो. कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते.
  • ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे अशा कारले  खूपच फायदेशीर ठरते. दम्याच्या आजारामध्ये कारल्याची भाजी काहीही  मसाले न वापरता देखील बनवून खाल्ल्याने फायदा होतो.
  • पोटात जर गॅसेस ची समस्या असेल आणि अपचनाचा त्रास होत असेल तर कारल्याचा रस घेणे चांगले असते जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहतात.
  • कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतं त्याचबरोबर यकृताच्या सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात. कावीळ मध्ये देखील  फायदेशीर आहे.
  • कारल्याच पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने प्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकारचे संसर्ग झाल्यास बरे होतात.
  • उलट्या, जुलाब किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याच्या रसात काळे मीठ टाकून पिल्यास  लगेच आराम मिळतो. जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो.
  • अर्धांगवायूचा त्रास झाला असेल तर ती कारले खाणे खूप प्रभावी उपाय आहे. त्यात कच्चे कारले रुग्णासाठी फायदेशीर आहे.
  • डायबिटीस च्या आजारासाठी देखील हे प्रभावी  मानले जाते. डायबिटीज असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचा रस, तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी  फायदेशीर आहे.
  • मुळव्याध  झाली असेल व त्यातून रक्त पडत असेल तर एक चमचा कारल्याचा रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास आता आराम मिळतो.
  • संधिवात किंवा हातापायाची जळजळ होत असल्यास कारल्याचा रस चोळणे फायदेशीर असते.
  • किडनीच्या त्रासासाठी  कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात. याच्या सेवनाने मुत्रपिंडातील सक्रीय होऊन शरीरातील  हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते.
  • हृदयाच्या विकारासाठी कारले हे रामबाण उपाय आहे. हे आणि कारक चरबी ला रुदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही. यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता कमी असते.
  • लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात तसेच त्वचेचे आजार होत नाही.
  • कर्करोगाशी लढण्यास साठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर असते.
  • हृदयाच्या विकारासाठी कारले हे रामबाण उपाय आहे. हे आणि कारक चरबी ला रुदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही. यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता कमी असते.
  • लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात तसेच त्वचेचे आजार होत नाही.
  • कर्करोगाशी लढण्यास साठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर असते.
English Summary: health advantage of bitter gourd Published on: 14 June 2021, 08:51 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters