पावसाळा म्हटलं म्हणजे आपल्या समोर रम्य दृश्यांचे चित्र येत असते. परंतु पावसाळ्यात रम्य दृश्यांसह काही धोकेदायक गोष्टी येत असतात. त्या म्हणजे साथीचे आजार, या साथीच्या आजारात डेंग्यू हा महाभंयकर आजार आहे. वेळेवर याचा उपचार नाही केला तर आपल्याला जीवही गमवावा लागतो. डेंग्यूपासून वाचण्यासाठी आता आपल्याला दवाखान्याऐवजी आपण स्वंयपाक घरात जावे लागेल. कारण आपल्या आहारातील मूग डाळ ही डेंग्यूसाठी गुणकारी आहे.
पण पुष्कळ लोकांना मूग डाळ खायला आवडत नाही, परंतु या डाळीमध्ये असे बरेच गुण आहेत जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या डाळीचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक आजार बरे होतात. मूग डाळीमध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, जस्त आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक पदार्थ असतात. ही डाळ खाणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होऊ शकेल. मुंग डाळचे पाणी कसे बनवायचे आणि त्याच्या वापराच्या फायद्यांविषयी माहिती घेऊया.
मूग डाळ पाण्यात असलेले पोषक
मूग डाळ पाण्यात प्रथिने, चरबी, फायबर, साखर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक समृद्ध आहे. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन बी 1, बी 5, बी 6, थायमिन, आहारातील फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च देखील आहेत.
मूग डाळ पाणी कसे बनवायचे
- सर्व प्रथम, प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करा.
- पाणी गरम झाल्यावर त्यात मूग डाळ टाका व नंतर चवीनुसार मीठ घाला.
- 2 ते 3 शिटी येईपर्यंत शिजवा. यानंतर, मुंग दाळ द्रावण चांगले गाळून घ्यावे. अशाप्रकारे मूग डाळचे पाणी पिण्यासाठी तयार होईल.
मूग डाळ पाणी पिण्याचे फायदे
- दररोज त्याचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो, कारण त्यात कमी कॅलरी असून जास्त फायबर असतात.
- मूग डाळ पाण्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढण्यास मदत होते.
- याशिवाय रक्तातील ग्लूकोजवरही नियंत्रण असते.
- डेंग्यूसारख्या गंभीर आजाराच्या बाबतीत मूग डाळचे पाणी पीणे खूप फायदेशीर आहे.
- या डाळीच्या पाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
- त्याचे सेवन केल्याने शरीरातील उपस्थित घाण दूर होते, अशाप्रकारे शरीर शुद्ध होते.
- या डाळीचे पाणी यकृत, पित्त, मूत्राशय, रक्त आणि आतडे स्वच्छ करते.
लेखक
महेश गडाख (M.Sc Agri)
Share your comments