Health

सध्याच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. बऱ्याच लोकांमध्ये शांत झोप येत नाही ही समस्या उद्भवत असते. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शरीराला शांत झोप गरजेची आहे.

Updated on 20 September, 2022 10:30 AM IST

सध्याच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. बऱ्याच लोकांमध्ये शांत झोप (sleep drink) येत नाही ही समस्या उद्भवत असते. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शरीराला शांत झोपेची गरज असते.

चहा खूप प्यायल्याने शांत झोप लागत नाही असं आपण नेहमीच ऐकतो. चहामध्ये (tea) असणारे काही घटक शरीरात उर्जा निर्माण करतात. त्यामुळे रात्री तर शक्यतो चहा पिणे टाळलेच पाहिजे, असं आपण नेहमीच ऐकतो. पण सध्या स्लीप टी (sleep tea) नावाचा चहा एक प्रकार चांगलाच गाजत आहे.

माहितीनुसार हा चहा चक्क झोपेचा चहा म्हणून ओळखला जातो. जर तुम्हाला शांत झोप येत नसेल, रात्री वारंवार झोपमोड होत असेल किंवा रात्री लवकर झोप लागत नसेल, तर हा स्लीप टी तुमच्यासाठी उत्तम फायदेशीर ठरू शकतो. स्लीप टी (Sleep tea) म्हणजे कसा? याविषयी आपण जाणून घेऊया.

सरकारच्या 'या' योजनेत 1 लाख रूपयांचे होतील 5 लाख रुपये; एकदा गुंतवणूक करून पहाच

स्लीप टी म्हणजे काय?

स्लीप टी म्हणजे कॅमोमाईल या फुलाचा चहा Chamomile. कॅमोमाईल हर्बल टी (Chamomile herbal tea) म्हणून हा चहा ओळखला जातो. स्पॅनिश मँझानिला टी म्हणूनही हा चहा ओळखला जातो. हिंदी भाषेत त्याला कैमोमाइल असं म्हणतात. ही फुलं प्रामुख्याने जर्मनी आणि रोममध्ये सापडतात.

या फुलांमध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे हा चहा अतिशय आरोग्यदायी मानला जातो. या चहामध्ये नैसर्गिक स्वरुपातलं कॅफेन असतं, असंही सांगितलं जातं. तसेच कार्बाेहायड्रेट्स (Carbohydrates), कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, फॉलिक ॲसिड तसेच व्हिटॅमिन ए देखील या चहामध्ये मोठ्या प्रमाणात असतो.

ऐण सणासुदीच्या काळात तांदूळ महागणार; सर्वसामान्यांना मोजावे लागणार जादा पैसे

या चहाला स्लीप टी यामुळे म्हणतात

1) माहितीनुसार कॅमोमाईल फुलांमध्ये असणारे काही घटक अनिद्रेचा त्रास दूर करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे या चहा स्लीप टी म्हणून ओळखला जातो.
2) तसेच या चहामध्ये ॲपिजेनिन हा घटक असतो. तो शरीर आणि मन रिलॅक्स (Relax the mind) करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
3) स्नायूंना आलेला थकवा घालविण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरत आहे.
4) त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी हा चहा घेतला तर शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होईल आणि शांत झोप येईल. त्यामुळे या चहाला स्लीप टी म्हणून ओळखला जातो.

महत्वाच्या बातम्या 
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक; जीवन आनंद योजना देतेय संधी
२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी राजयोग: 'या' ५ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेचे मिळणार वरदान
शेतकऱ्यांनो तारणकर्ज योजनेचा लाभ घेऊन चांगल्या दराने धान्य विक्री करा; जाणून घ्या प्रक्रिया

English Summary: good night sleep drink sleep tea once Get good relief
Published on: 20 September 2022, 10:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)