दिवसेंदिवस मधुमेह होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच निघाली आहे. मागील अनेक वर्षांपूर्वी वृद्ध वयामध्ये लोकांना मधुमेह सारखे आजार होत असायचे पण बदलत्या काळानुसार अगदी कमी वयातील म्हणजेच लहान वयातील मुलांना सुद्धा मधुमेह सारख्या समस्या उधवत आहेत. आपल्या खाण्यामध्ये संतुलन बिघडले की मधुमेहासारख्या समस्या उदभवतात. मधुमेह झालेल्या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा आपल्या आहारात समावेश कोणत्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच त्यांनी आहाराची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की वेळोवेळी जेवण करणे आणि वेळेवर झोप घेणे सुद्धा गरजेचे राहते. असे काही औषधी पदार्थ आहेत जे आपल्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे जे की यामुळे आपल्या शरीरात असणारी साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
१. दालचिनी :-
आपल्या घरामध्ये दालचणी असतेच जे की विविध आजारांवर दालचिनी चा प्रयोग केला जातो. दालचिनी या मसाल्यामध्ये अँटीबैक्टीरियल, अँटीवायरल तसेच अँटीफंगल सारखे गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. शास्त्रज्ञानी केलेल्या संशोधनानुसार दालचिनी या मसाल्यामुळे टाईप 2 मधुमेह चा प्रकार म्हणजेच हा धोका कमी होण्यास मदत होते. थोडक्यात ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्या व्यक्तींनी आपल्या आहारात दालचिनी सारखा मसाला ठेवणे गरजेचे आहे.
२. हळद :-
आपल्या आरोग्यासाठी हळद खूप लाभदायक मानली जाते जे की आपल्या शरीरावर कोणती जखम झाली तरी सुद्धा त्या जखमेवर आपण हळदीचा लेप देतो जे ने आपली जखम बरी होते. हळद हा एक मसाला सुपरफूड मसल्यांपैकी एक मसाला आहे जो आपल्या आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. आपल्या आहारात हळदीचा समावेश असणे गरजेचे आहे जे की अशा आजारापासून तुमची सुटका करते.
३. मेथीचे दाणे :-
मेथीचे दाणे हे आपल्या आरोग्याला खूप चांगले असतात जे की मधुमेह झालेल्या रुग्णांना हे दाणे खूप फायदेशीर ठरतात. ज्या व्यक्तींना टाईप 2 मधुमेह आहे त्या लोकांसाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात. रोज संध्याकाळी एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि पाण्यात भिजू घाला जे की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते दाणे बाजूला काढून पाणी पिणे.
४. जिरे :-
तुम्ही जर रोजच्या आहारामध्ये जिऱ्याचा वापर केला तर तुमच्या शरीरातील रक्तात असणारी साखरेची पातळी कमी होणार आहे जे की जिरे हा एक असा मसाला आहे ज्याने आपल्या शरीरात असणारे कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होण्यास मदत होते. सर्वात खास जिऱ्याबद्धल गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचे वजन सुद्धा कमी करण्यास मदत होते.
Share your comments