सद्गुरू मोरेदादा ट्रस्टच्या अंतर्गत भवानीनगरमध्ये मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण आणि मार्गदर्शन होणार आहे. शुक्रवार दिनांक 18- 11- 2022 रोजी याचे आयोजन केले आहे. याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
ह्दयविकार, मधुमेह, सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्तदाब, सांध्यांचे विकार, त्वचा विकार, वात विकार, पोटांचे विकार, महिलांचे विकार मुतखडा, मूळव्याध, लहान मुलांचे विकार इत्यादी विकारांचे निदान केले जाणार आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्यामार्फत आयोजन केले जाणार आहे.
तसेच शिबिराच्या ठिकाणी सर्व आजारांवर माफक दरात आयुर्वेदिक औषधे मिळणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. डॉ. पाटीलताई, डॉ. श्री. गौरकरसर हे मार्गदर्शन करणार आहेत.
पुन्हा पाऊस! पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता..
यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या अनेक आरोग्याच्या तक्रारी अनेकांना जाणवत आहेत. तसेच यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च देखील येत आहे. यामुळे सद्गुरू मोरेदादा ट्रस्टच्या अंतर्गत अशा प्रकारे शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
लाल मिरची 700 रुपये किलो, उत्पादन घटल्याचा परिणाम
मोर्चा इफेक्ट! आता खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरले जाणार
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर
Share your comments