1. आरोग्य

रात्री झोप येत नाही म्हणून चिंताग्रस्त आहात, तर फॉलो करा या टिप्स

courtesy-healthy nuske

courtesy-healthy nuske

 दिवसभराची दगदग,कामाचा प्रचंड ताण, आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींची चिंता, भविष्यातील काळजी अशा बऱ्याच गोष्टींमुळे रात्री खूप वेळपर्यंत झोप लागत नाही.रात्री गोष्टीत झोप न झाल्यामुळे येणारे सकाळी ही एकदम निरुत्साही,कुठल्याही गोष्टीत होणारी चिडचिड,फ्रेश न वाटणेया समस्या निर्माण होतात. आज-काल झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.रात्री निवांत झोप नयेणे यामागे बरीच कारणे आहेत. ते आपण आगोदर पाहू

 झोप न येण्याची काही कारणे

 • कामाचा किंवा अभ्यासाचा ताण
 • कष्टाची कामे
 • भविष्याविषयी चे अनावश्यक चिंता
 • टीव्ही किंवा मोबाईलची नको तेवढी सवय
 • व्यसन
 • अती प्रवास
 • नैराश्य
 • नातेसंबंधांमधील ताण तनाव

 

 रात्री व्यवस्थित झोप यावी यासाठी फॉलो करा या टिप्स

 • रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावणे:

आज-काल अत्यंत धकाधकीच्या जीवनात रात्रीच्या झोपण्याची वेळ पाहणे कठीण असला तरी अशक्य मुळीच नाही.त्यासाठी शक्य तितक्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

 • झोपण्याची सकारात्मक विचार करा किंवा सकाळ आपण पुस्तके वाचने- रात्री झोप नलागणे यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डोक्यात सुरू असलेली चिंता,असल्या तरी गोष्टीविषयी ची काळजी.यासाठी रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना तो सकारात्मक विचार केल्यामुळेकिंवा सकारात्मक पुस्तक वाचल्यामुळे डोक्यातील विचार,काळजीदूर होण्यास मदत होते व शांत झोप लागते.
 • झोपण्याची चांगली वातावरण निर्मिती करणे- बऱ्याच जणांना झोपताना टीव्ही पाहतो मोबाईल बघत  झोपायची सवय असते. परंतु या गोष्टीमुळे तुम्हाला झोप येऊ शकत नाही.
 • यामुळे तुमच्या डोळ्यांवर अधिक ताण येतो आणि मेंदूला झोपण्याचा संकेत मिळत नाही.यापेक्षा तुम्ही जरतुमच्या बेडरूममध्ये मंद प्रकाशात दिवा लावला किंवाबेडशीट किंवा उशीचे कवर बदलले किंवा एखादं शांत संगीतऐकले तरी तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
 • रात्री हलके जेवण करा- रात्री शक्यतो जड आहार घेणे टाळा. कारण त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊशकतो. रात्री जर चुकून जास्त जेवण झाल्यास आधी तुम्ही थोडेफार शतपावली न करता झोपला तर झोप लागने जवळ जवळ अशक्यप्राय होते. त्यामुळे झोपायच्या आधी कमीत कमी दोन तास आधी जेवण करणे कधीही चांगले.
 • रात्री झोपताना मनात चांगले विचार असतील तर चांगली झोप लागते.त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार,मेडिटेशनआणि प्रार्थना केली तर तुमचे मन प्रसन्न होते आणि गाढ झोप देखिललागते.

 

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters