कोरोनाने गेल्या दोन वर्ष अख्या जगात जे काही थैमान घातले त्या सगळ्यांना माहिती आहे. अजूनही कोरोना संपूर्ण केलेला नसून अजून देखील मनामध्ये भिती आहे. त्याच आत्ता काही दिवसांपासून मंकीपॉक्स या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या रोगाचे निदान करण्यासाठी अगोदर प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागत होते परंतु आता एक सोपा मार्ग सापडला असून मंकीपॉक्सचे निदान करण्यासाठीची पहिली स्वदेशी कीट लॉन्च करण्यात आली आहे.
नक्की वाचा:कोरोना वाढतोय! प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, वाचा आता नवीन नियम..
त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणुची ओळख पटवणे आता सोपे होणार आहे व वेळीच त्याबाबतचा रिपोर्ट येऊन संबंधित रुग्णावर वेळीच उपचार करण्यास देखील मदत होणार आहे. ही किट केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सूद यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. ही किट ट्रान्सएशिया एर्बा मेडिकल्स या फार्मासुटिकल कंपनीने तयार केली आहे. त्यामुळेबराच दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
आतापर्यंत मंकीपॉक्सची भारतातील स्थिती
आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये एकूण मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 10 वर पोचली असून यामध्ये आठ पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत पाच रुग्ण असून केरळ राज्यात पाच रुग्ण आढळले आहेत.
तसेच आता आयसीएमआरने मंकीपॉक्स ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीजची उपस्थिती तपासण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्याची देखील शक्यता आहे. या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने देखील आणीबाणी घोषित केली आहे.
Share your comments