आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. जे की आपल्या शरीरातील महत्वाचा भाग किडनी आहे. किडनी मधील नेफ्रॉन्स हे फिल्टर सारखे काम करत असतात. किडनी हे लघवीच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतात आणि आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करत असतात. जे की एवढेच नाही तर किडनी हे लाल रक्तपेशी तयार करण्याचे काम देखील करतात व तसेच हार्मोन्स रिलीज करतात ज्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र अनेक वेळा किडनीच्या काही समस्या उदभवल्याने आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होण्यास चालू होते.
अगदी सुरुवातीच्या काळामध्ये किडनीच्या समस्या सामोरे येत नाहीत मात्र पुढे जाऊन याच समस्या आपणास खूप मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरतात. परंतु त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. शास्त्रज्ञानी खूप वर्ष शोध लावून असा एक पर्याय शोधला आहे जो अगदी स्वस्त उपचारात तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुम्हाला भविष्यात किडनी चा त्रास होईल का नाही. जो की हा उपचार तुम्हाला किडनीचा आजार ओळखण्यास मदत करेल.
हेही वाचा:-जाणून घ्या, करडई लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापन, वाचा सविस्तर.
सॅन फ्रान्सकोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील वैज्ञानिक लोकांनी यासाठी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले आहे. जे किडनीच्या समस्यातील रोगांची जे पीडित आहेत ते लघवी मधून प्रोटीन चे प्रमाण सांगून हे सांगू शकतील की त्यांना भविष्यामध्ये किडनी संबंधी आजार होणार आहे की नाही. या सध्या उपचारामुळे अनेक लोकांना डायलिसिस तसेच किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासणार नाही.
चिवुआन हे या संशोधनातील मुख्य घटक आहेत जे की हे वैज्ञानिक असे म्हणाले की लघवीमध्ये जे जास्त प्रमाणात प्रोटीन आहे ते भविष्यात तुम्हाला किडनीच्या आजाराचे संकेत देणार आहे. मात्र या उपचाराचा वापर ज्यांना किडनी इंजुरी आहे त्यांच्यासाठी होणार नाही. ही साधी सोपी प्रकिया आहे जी कोणतेही चिरफाड करण्याचे काम देखील नाही. एकदा किडनीच्या समस्येतून बाहेर जरी आला तरी अनेक वेळा ती समस्या उदभवण्याचे काम देखील होते. एवढेच नाही तर अनेक लोकांच्या किडन्या फेल तर हृदय संबंधी अनेक समस्या आढळून येतात. तर काही लोकांना मृत्यू शी लढा करावा लागतो.
Share your comments