मेथी दाण्यांमध्ये प्रथिने यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. अनेक ठिकाणी मेथीचे दाणे हे फोडणीसाठी व औषधांच्या स्वरूपात वापर केला जातो. थंडीच्या दिवसात मेथीच्या दाण्यांचा पाक करून तोच जेवणासोबत खाण्याची पद्धत आहे.
मेथीच्या दाण्याचा आहारामध्ये नियमित समावेश केल्यास वात रोगापासून आराम मिळतो. बसेस सांधेदुखी, गुडघेदुखी, वेदना इत्यादी प्रकारच्या दुखण्या मध्ये मेथीच्या दाण्यांचा उपयोग करण्यास आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे. मेथीचे दाणे हे स्वादिष्ट थोडेसे कडवट परंतु अनेक गुणांनी उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये मेथीच्या दाण्यांना अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. मेथीच्या दाण्यांचा उपयोग भाजी बनवण्यासाठी व औषधी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
नक्की वाचा:Successful Farmer: कांद्याला बगल दिली आणि कलिंगड लागवड करत चांगला नफा मिळवला
2) मेथी दाना फायदे :
1) मेथी दाना व मलावरोध :- अजीर्ण झाल्यामुळे उत्पन्न झालेल्या मलावरोध यात मेथीची भाजी सेवन केल्याने फायदा होतो. मधुमेह या आजारात दररोज सकाळी 100 ग्रॅम मेथीच्या भाजीचा रस सेवन केल्यास किंवा मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी चावून खावेत व नंतर पाणी प्यावे. रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असल्यास सकाळ संध्याकाळ दोन वेळा मेथीच्या भाजीचा रस घ्यावा व याच बरोबर आहारात गूळ तांदूळ तेलकट-तुपकट व गोड पदार्थांचे सेवन टाळावे यामुळे मधुमेहा मध्ये ही फायदा होतो.
2) मेथीदाणा आणि कमी रक्त दाब :- ज्या व्यक्तींना कमी रक्तदाब असेल त्यांच्यासाठी मेथीच्या भाजीत आले लसूण गरम मसाला टाकून बनवलेल्या भाजीचे सेवन हे लाभदायक असते.
दीर्घकालीन उच्च रक्तदाब हा अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. यामुळे हृदयाच्या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे यामुळे मस्तिक व नसा संबंधित संदर्भात होणारे आजार, रक्ताचे आजार, किडनी आजार इत्यादी उच्चरक्तदाबामुळे उद्भवतात. एका वैज्ञानिक संशोधनानुसार मेथीच्या दाण्यात एटीहायपरटेसिव प्रभाव मिळालेला आहे जो रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यास मदत करतो म्हणून उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश केल्यास लाभदायी ठरते.
3) मेथी दाना आणि जंत :- लहान मुलांच्या पोटामध्ये जंत झाल्यास किंवा कृमी झाल्यास अशा मुलांना मेथीच्या भाजीचा रस रोज थोडा थोडा दिल्यास लहान मुलांच्या पोटातील जंत बाहेर पडतात.
4) मेथी दाना व सर्दी-पडसे :- कफामुळे नेहमी ज्या व्यक्तींना सर्दी-पडसे व खोकल्याचा त्रास होतो अशा लोकांनी तिळाचे किंवा मोहरीच्या तेलामध्ये गरम मसाला आद्रक लसुन टाकून बनवलेली मेथीची भाजी खाल्ली तर सर्दी-पडसे बरे होते.
5) मेथीदाणा व वात रोग :- मेथीची हिरवी किंवा सुकी भाजी रोज खाल्ल्यास शरीराच्या 80 प्रकारच्या विकारांमध्ये मेथी मुळे फायदा होतो. तसेच वायूमुळे होणाऱ्या हातापायांच्या दुखण्यात मेथी दाणे तुपात भाजून त्यांचे चूर्ण करावे व त्याचे लाडू बनवून रोज एकेक खावा. या प्रयोगाने लाभ होतो.
6) मेथी दाना व उष्माघात :- उष्माघात मेथीची सुकलेली भाजी थंड पाण्यात भिजवावी पूर्णपणे भिजल्यावर ती कुस्करून गाळून घ्यावी व त्या पाण्यात मध मिसळून रुग्णाला एक वेळा पाजावे यामुळे उष्माघाताचा परिणाम कमी होतो.
7) मेथी दाना आणि मधुमेह :- मेथीच्या दाण्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे करण्यास हवा कारण मेथी हे रक्तातील साखर नियंत्रित करते. मेथीच्या दाण्यांवर संशोधकांनी अनेक संशोधन केलेले आहेत. त्यातून असे समोर आलेले आहे की मेथीचे दाणे हे टाईप टू डायबिटीस या आजारात इन्शुलिनची मात्रा नियंत्रित करते. म्हणून सामान्य साखरेचे रोग असलेले व्यक्तींनी म्हणजेच डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी मेथीच्या दाण्यांचा आपल्या आहारामध्ये नियमित जरूर समावेश करावा.
Share your comments