फळ म्हटलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठलेही फळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसे फळ आपण कोणत्याही वेळी खातो.अगदी सकाळी नाश्त्याच्या वेळी देखील आपण बऱ्याच वेळेस फळांचा वापर करतो. परंतु जर केळी बद्दल विचार केला तर जास्तीत जास्त लोकांना वाटतं की सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरत.
पण बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की केळी खाण्याचे योग्य वेळ कोणती आहे? आयुर्वेदामध्ये याबाबतीत सांगण्यात आल आहे. या लेखात आपण केळी खाण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल माहिती घेऊ.
बरेच जण सकाळी नाश्ता म्हणून केलेले दूध याचा वापर करतात. बरेचव्यक्ती केळी आणि दुधाचा उपयोग वजन वाढवण्यासाठी करतात.केळी मुळे शरीराला ऊर्जा मिळते. परंतु सकाळच्या वेळेस दूध आणि केळी खाणे फायदेशीर ठरतं? अजूनही बऱ्याच लोकांना केळी खाण्याचीयोग्य वेळ माहीत नाही.
केळी खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे
केळी हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबाबत कुठलेही प्रकारचे दुमत नाही.हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीराला आलेला थकवाघालवण्यासाठी देखील केळी अत्यंत उपयोगी आहे.केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो तसेच आलेला ताण कमी करण्यासाठी,बद्धकोष्टता आणि अल्सरच्या समस्या दूर करण्यासाठी देखील केळीमदत करते. तसेच शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी देखील केळीचा उपयोग होतो. हे झाले केळीचे आरोग्यदायी फायदे. परंतु केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? हे आता आपण पाहू.
सकाळी अनुशापोटी केळी खाऊ नका
सकाळच्या नाश्त्यामध्ये कळीचा समावेश करणे उत्तम आहे परंतु अनुशापोटी खाणं शक्यतो टाळाव. केळी सोबत ड्रायफ्रुट्स, सफरचंद आणि इतर फळांच ही सेवन करणे फार गरजेचे आहे. ज्यामुळे शरीरामधील आमलीय पदार्थांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. केळी मध्ये मॅग्नेशिअम हा घटक असतो. मॅग्नेशियम मुळे रक्तामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ची पातळी बिघडवण्याचे काम करत. यामुळे कार्डिओ व्हॅस्क्युलर सिस्टम वर परिणाम होऊ शकतो. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी अनुशापोटी केळी खाणे योग्य नाही.
केळी खाण्याची ही योग्य वेळ नाही
सकाळी अनुशापोटी केळी खाल्ल्याने भूक मरते. शरीरासाठी अनुकूल नाही. अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी केले जातात,हेही शक्यतो टाळावे.कारण बऱ्याचदा रात्री केळी खाल्ल्याने खोकल्याचे समस्या निर्माण होऊ शकते. तसेच रात्री केळी खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता.
केळी खाण्याच्या बाबतीत आयुर्वेद काय म्हणते?
आयुर्वेदानुसार ब्रेकफास्ट केल्यानंतर केळी खाणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार केळी खाण्याची योग्य वेळ सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंतचीआहे. परंतु या वेळेस सुद्धा नाष्टा केल्यानंतरच केळी खाणे फायदेशीर ठरतो. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे शक्यतो टाळावे.
टीप- वरील सर्व गोष्टी या माहिती स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही.यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
Share your comments