जेवणात वापरला जाणारा कांदा शरीरातील अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरतो. कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढतो. कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे.
आज आपण या लेखात कांद्याचे गुणकारी फायदे जाणून घेणार आहोत..
कच्च्या कांद्यामधील पोषक प्रमाण
कॅलरी 64
कार्बोहायड्रेट 15 ग्रॅम
चरबी – 0 ग्रॅम
फायबर – 3 ग्रॅम
प्रथिने – 2 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0 ग्रॅम
साखर – 7 ग्रॅम
कांदा खाण्याचे फायदे वाचा
कच्चा कांदा रक्तदाब नियंत्रित करतो. कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनोऍसिड असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयासंबंधित समस्या कमी होतात. बऱ्याचदा केस शरीरावरील केस तुटल्याने त्या ठिकाणी फोड येतो आणि वेदना होतात. कांदा भाजून त्यावर बांधल्याने केस तोडीच्या वेदना कमी होतात आणि फोडदेखील बरा होतो.
कांदा खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो. हे तुमचे हृदय निरोगी ठेवते.
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्स असतात. हे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
कांद्या हे कर्करोगापासून बचाव करते. विशेषतः कोलन कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग कमी होतो.
कांद्यामध्ये क्रोमियम असते. हे आपल्या रक्तातील साखर नियमित करण्यास मदत करते.
कांद्याचा छोटा तुकडा नाकात ठेवल्याने श्वासोच्छवासामुळे नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या कमी होते.
कांद्यामध्ये फोलेट असते, यामुळे डिप्रेशन आणि झोप कमी होण्यास मदत होते.
कांद्यामध्ये अ आणि क जीवनसत्त्वे असतात. हे आपले केस आणि त्वचा निरोगी ठेवते.
Share your comments