1. आरोग्य सल्ला

उन्हाळ्यात ‘ही’ फळे खाल्ल्याने राहाल निरोगी आणि तंदुरुस्त

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते. अनेक फळे खाऊन आपणाला उकाड्यापासून आराम मिळवता येतो. पण ते फळ किती आरोग्यदायी आहे हे आपण आधी जाणून घ्यायला हवे. तर जाणून घेऊयात उन्हाळ्यात नेमकी कोणती फळे खाल्याने निरोगी राहता येऊ शकते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
उन्हाळ्यातील फळे

उन्हाळ्यातील फळे

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते. अनेक फळे खाऊन आपणाला उकाड्यापासून आराम मिळवता येतो. पण ते फळ किती आरोग्यदायी आहे हे आपण आधी जाणून घ्यायला हवे. तर जाणून घेऊयात उन्हाळ्यात नेमकी कोणती फळे खाल्याने निरोगी राहता येऊ शकते.

कलिंगड

हे उन्हाळ्याचे फळ आहे जे फक्त खायलाच नाही तर आपल्या शरीरास हायड्रेटदेखील करते. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले हे फळ आपल्या शरीराला केवळ आवश्यक पोषक आहार देत नाही तर पाण्याचे अभाव देखील पूर्ण करते. याशिवाय अनेक आजारांमध्येही कलिंगड प्रभावी आहे. कलिंगड खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते. तसेच तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. याशिवाय आपल्या शरीरात रक्ताची कमतरता देखील संपते.

किवी फळ

या दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाले आहे आणि त्याला भारतातही जास्त मागणी आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा दुप्पट आहे. व्हिटामिन सी व्यतिरिक्त व्हिटामिन के, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि आहारातील फायबर देखील किवीमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त किवी अँटि-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे. म्हणून केवळ प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर एकूण आरोग्यासाठी देखील किवी खूप फायदेशीर आहे.

 

स्ट्रॉबेरीला

बर्‍याच लोकांनी सुपरफ्रूट देखील म्हटले आहे. 1 कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त त्यात हेल्दी फोलेट आणि अँटीऑक्सिडेंट देखील आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ती नैसर्गिक पद्धतीने आपले दात पांढरे करण्यात मदत करते.

 

आंबा

ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.

आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. अननसमध्ये 80 मिलीग्राम व्हिटामिन सी असते. याशिवाय त्यात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम आढळते, जे अन्न खाल्ल्यानंतर पोट फुगी आणि आपचनापासून दूर राहण्यात देखील मदत करते.

English Summary: Eating this fruit in summer will keep you healthy and fit Published on: 18 April 2021, 10:57 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters