समाजामध्ये अनेक मांसाहार करणारे व्यक्ती आढळतात. त्यातल्या त्यात यामध्ये देखील वेगळ्या प्रकारचे लोक असून म्हणजे काहींना चिकन किंवा मटण खाण्याची आवड असते तर काही खवय्ये मासे प्रेमी असतात. आता आपल्याला माहित आहे की,माशांचे वेगवेगळे प्रकार आहेत व त्यांच्या प्रकारानुसार त्यांची लागणारी चव आणि आरोग्यदायी फायदे हे देखील वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. या लेखात आपण अशाच एका आरोग्यासाठी उपयुक्त अशा माशाची माहिती घेणार आहोत जो आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
आरोग्यासाठी उपयुक्त आहे 'घोळ' मासा
हा मासा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मासे खाणाऱ्या लोकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. या माशांचा मधला काटा म्हणजेच मणक्याचा भाग खवय्ये अतिशय आवडीने खातात. त्यामुळे या माशाला चांगली मागणी असते व बाजारपेठेदेखील जास्त दरात विकला जातो.
नक्की वाचा:Health: जास्त वजनाची नका करू काळजी,आहारात करा 'या' सूपाचा वापर वजन होईल कमी
1- घोळ मासातील डीएचए आणि एपीए हे घटक लहान मुलांच्या आरोग्याला खूप फायदेशीर असून प्रौढ व्यक्तीमधील रक्तदाबाची समस्या देखील नियंत्रणात राहते.
2- या माशांमध्ये omega-3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण असून त्यामुळे स्मरण शक्ति मजबूत होते व मुबलक प्रमाणात ओमेगा-3 घटक असल्यामुळे मेंदूच्या कार्याला व नसांना त्याचा फायदा होतो.
3- त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी देखील घोळ मासा खूप उपयुक्त आहे. काही व्यक्तींना अकाली चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. हा त्रास कमी करण्यासाठी व त्वचा मुलायम राहण्यासाठी या माशाचे सेवन फायदेशीर ठरते.
4- तसेच शरीरातील दाह कमी करण्यासाठी या माशांमध्ये असलेले omega-3 ऍसिड खूप मदत करते त्यामुळे त्वचेला होणारे नुकसान देखील नियंत्रणात राहते.
5- घोळ माशांमधील विटामिन, विविध खनिजे आणि प्रोटीन सारखे घटक डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते व दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी देखील मदत होते.
6- मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी व त्यांना मजबुती देण्यासाठी देखील हा मासा अत्यंत फायदेशीर आहे. या माशाच्या सेवनाने शरीराला अतिशय उत्तम प्रतीचा विटामिनचा पुरवठा होतो.
7- पचनसंस्था उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी घोळ माशांचे आहारातील समावेश खूप महत्त्वपूर्ण आहे.
Share your comments