आपल्या स्वयंपाक घरात तूप नेहमी असते. तूप स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. अनेक गोड-धोड पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. तुप ज्या पद्धतीने चवीला उत्कृष्ट असते अगदी त्याच पद्धतीने त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्याला विशेष फायदेशीर ठरतात.
आयुर्वेदामध्ये तुपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे याला आयुर्वेदात सुपर फूड म्हणून संबोधले आहे. तूप एक असे सुपरफूड आहे जे स्वयंपाकाला चविष्ट बनवते शिवाय यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात. तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि सी सारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे मानवी शरीराला आवश्यक पोषण पुरवतात.
तसेच शरीराच्या इतर अवयवांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. तुप खाल्ल्याने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात पण उन्हाळ्यात तुपाचे सेवन सर्वात उत्तम असल्याचे सांगितले जाते म्हणून आज आपण उन्हाळ्यात तुपाचे सेवन केल्याने होणारे फायदे जाणून घेणार आहोत.
आपल्या शरीराला ऊर्जा देते
आहारतज्ञ यांच्या मते, तुपात हेल्दी फॅट्स असतात. जे की आपल्या शरीरातील पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. याशिवाय तूप खाल्ल्याने मानवी शरीराला ऊर्जा मिळत असते. तुपाचे सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण सुधारते. यासोबतच शरीरातील आवश्यक हार्मोन्सच्या निर्मितीसाठीही तूप खाल्लेलं फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या:-सावधान! दही सोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; अन्यथा पडेल महागात; वाचा याविषयी
तूप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
आहारतज्ञ सांगतात की, उन्हाळ्यात अनेक विषाणूजन्य संसर्गाचा धोका असतो. तूप खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, ताप तसेच इतर व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होते. दुसरीकडे, तूप हे ब्युटीरिक ऍसिड नावाच्या शॉर्ट चेन फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे. यासोबतच तुपात अ आणि क जीवनसत्त्वे देखील असतात, जे की रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास विशेष फायदेशीर ठरतात.
शरीराला थंडावा देते
तूप चवीला गोड आणि प्रकृतीने थंड असते. उन्हाळ्यात तूप खाल्ल्याने आतून शरीर थंड राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील जळजळ देखील यामुळे कमी होते. हे शरीरातील पित्त नियंत्रित करण्यास मदत करते आणि शरीरातील उष्णता थंड करते. यामुळे उन्हाळ्यात आवर्जून तुपाचे सेवन करावे.
संबंधित बातमी:-आरोग्यतज्ञांचा लाख मोलाचा सल्ला! उन्हाळ्यात 'या' चुका करू नका नाहीतर आजारी पडाल
Share your comments