हिवाळा हा सगळ्यांचा आवडता ऋतू आहे.सगळीकडे गार गार वातावरण असल्यामुळे होणाऱ्या उकाड्यापासून सुटका मिळते.परंतु हा हिवाळाबऱ्याच वेळेला अनेक आजार सुद्धा सोबत घेऊन येत असतो.
कारण थंड हवामानात बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊन खोकला, सर्दी व ताप यासारख्या समस्या जास्त प्रमाणातहिवाळ्यात दिसायला लागतात. हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर यास साथ नैसर्गिक फूडचेजर आपण सेवन केले तर नक्कीच या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. या लेखात आपण या नैसर्गिक फूडविषयी माहिती घेऊ.
हिवाळ्यात महत्त्वाचे असलेले सात नैसर्गिक फूड
- मध- मद सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते.प्रतिकारशक्ती चांगली राहते. जर खोकला आणि घशात खवखव होत असेल तर त्या पासून आराम मिळतो.लिंबू पाण्यासोबत याचे सेवन करू शकता.
- लसुन- लसूण सर्दी,खोकला आणि तापासाठी लाभदायक आहे. इन्फेक्शन पासून बचाव होतो तसेचइम्युनफंक्शन चांगले राहते.
- चिकन सूप- हिवाळ्यात चिकन सूप मुळे अनेक फायदे होतात.पचन चांगले होते. इलेक्ट्रो लाईट्स आणि फ्लूडसचा चांगला स्रोत आहे. ताप, छातीत कफ या समस्येत आराम मिळतो.
- दही- यातील घटकांमुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते.
- कॉमन कोल्ड ची जोखीम कमी होते. मात्र सावधगिरीने सेवन करा. यामुळे कपची समस्या असेल तर दही खाणे टाळा.
- ओट्स- यामुळे कार्डियाक हेल्थ बूस्ट होते.प्रतिकारशक्ती चांगली राहते.इनफ्लॅमेशनची समस्या दूर होते.पोटात कळ आणि डायरीयातआराम मिळतो.
- केळी-केळी सेवन केल्याने डायजेशन ठीक होते.सर्दी सोबत लढणारे अनेक न्यूट्रिएंट्स आणि कॅलरीज यामध्ये असतात.केळी खाल्ल्याने सर्दी होते हा भ्रम आहे.
- आले-याच्या सेवनाने मळमळ,फ्लू सारखे आजारात आराम मिळतो.वायरल इन्फेक्शन पासून बचाव होतो.
( टीप- कुठलाही औषधोपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )
Share your comments