हिवाळ्यात आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते, हिवाळ्यात साधारणपणे आपण गरम वस्तूंचे सेवन करत असतो. तसेच कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला मात देण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहाराचे आपण सेवन करत असतो. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपण नाना प्रकारच्या फळांचे तसेच विविध अन्नपदार्थांचे सेवन करतो. पण आपल्याला माहित आहे का, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता केवळ गूळ आणि फुटाणे खाल्ल्याने सुद्धा वाढू शकते. तसेच गुळ आणि फुटाणे अनेक रोगाशी लढण्यास देखील आपणास सक्षम बनवितात. गुळ आणि फुटाण्याचे विशेषतः हिवाळ्यात सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात, यात असलेले पोषक घटक शरीराला गरम ठेवतात तसेच आपले पाचन तंत्र मजबूत करण्यास मदत करतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया गुळ आणि फुटाणेचे सेवन नेमके कधी आणि कसे करावे तसेच याचे आपल्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे देखील जाणुन घेऊया.
गुळ आणि फुटाण्यात असलेले पोषक तत्व
फुटाण्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि विटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात. फुटाण्यात असलेले सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. तसेच गुळात आयरन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय गुळात मोठ्या प्रमाणात विटामिन्स आणि खनिजे आढळतात जे की आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. गुळ आणि फुटाणे यात असलेले हे पोषक घटक आपणास हिवाळ्यात अनेक रोगांपासून वाचवतात, तसेच हे पदार्थ हिवाळ्यात आपले शरीर गरम ठेवतात.
कसे करणार गुळ आणि फुटाण्याचे सेवन
रात्री फुटाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी भिजवलेले फुटाणे आणि गुळाचा खडारिकाम्या पोटी सेवन करा यामुळे आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे भेटतात. फुटाणे आणि गूळ चांगले चावून खाल्ले पाहिजेत.
गुळ आणि फुटाणे एकत्रित खाण्याचे फायदे
- लठ्ठपणा दूर करण्यास मदत करते- लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी नियमितपणे गुळ आणि फुटाणे सेवन करावे, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. फुटाण्यात असलेले पोषक घटक आपल्या शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने आपणास लवकर भूक लागत नाही.
- हाडांसाठी आहे खूपच फायदेशीर- फुटाणे मधासोबत सेवन केल्याने पुरुषातील सर्वात मोठी समस्या म्हणजे नपुसंकता देखील दूर केले जाऊ शकते. फुटाण्यासोबत गुळ अथवा मधाचे सेवन केल्याने मॅनपावर वाढते.
- रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते- साथीचे आजार होऊ नये म्हणून मानवाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे गरजेचे ठरते. त्यामुळे आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी गुळ आणि फुटाणे याचे नियमित सेवन केले पाहिजे यामध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करतात.
- पोटासंबंधित विकार दूर करण्यास मदत करते- जर आपणास पोटासंबंधित विकार असतील तर आपण सकाळी रिकाम्या पोटी फुटाणे आणि गुळाचे सेवन केले पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटदुखी इत्यादी पोटाचे विकार दूर होतात. तसेच गुळाचे आणि फुटाण्याचे नियमित सेवन केल्याने आपले पाचन तंत्र मजबूत होण्यास मदत होते.
Share your comments