हिवाळ्यात फळांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पेरूचे देखील थंडीच्या दिवसात सेवन केल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा पोहोचतो. तसे बघायला गेले तर पेरू एक हंगामी पीक आहे. पेरू हे साधारण थंडीच्या दिवसात जास्त बघायला मिळतात, पेरू कापून त्यावर चाट मसाला लावून खाण्यास खूप चविष्ट लागते. पेरू पासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे की पेरूची चटणी, लोणचे इत्यादी तसेच फिरू हा कच्चा देखील खाल्ला जातो. पेरू हा सर्वप्रथम मध्य अमेरिकेत आढळून आला होता, पेरूची साल हिरवी तसेच फिकट पिवळ्या रंगाचे असते.
पेरूचा आतील भाग म्हणजे पल्प हा सफेद, लाल किंवा गुलाबी रंगाचा असतो. आहार तज्ञांच्या मते, पेरू मध्ये अनेक विटामिन्स एंटीऑक्सीडेंट आणि लायकोपीन नावाचा घटक असतो, यामुळे आपल्या शरीरात रोग प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते, तसेच त्याचे सेवन केल्याने अनेक रोगांपासून वाचले जाऊ शकते. आज आपण पेरूच्या सेवनाने आपल्या शरीराला होणारे फायदे जाणुन घेणार आहोत, चला तर मग मित्रांनो वेळ ना दवडता जाणून घेऊया याविषयी.
पेरू खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
•डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर
आहार तज्ञांच्या मते पेरूमध्ये नॅचुरल साखरेचे प्रमाण लक्षणीय असते, त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांनी याचे सेवन केले तरी काही हरकत नाही. यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहते. यामध्ये असलेले फायबर डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत करतात.
•हेही वाचा :- Health Benifits: हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने 'हे' होतात आपल्या शरीराला आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या कसे बनवणार हळदीचे दूध
•पाचनतंत्र सुधारते
पेरूचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते, यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. यात प्रामुख्याने फायबर जास्त आढळतो जो की आपल्या शरीरासाठी अति महत्वाचा घटक आहे. यामुळे अपचन गॅस व इतर पोटाच्या समस्यांपासून दूर राहता येऊ शकते. असे सांगितले जाते की पेरूच्या बिया या पाचन तंत्र सुधारण्यात मदत करतात.
•हेही वाचा :- Benefits Of Pomegranate Leaves: डाळिंबच्या पानांचे सेवन केल्याने हे होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या याविषयी
•पेरूचे नियमित सेवन केल्याने दृष्टी सुधारते
पेरूचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पेरू मध्ये विटामिन ए चे प्रमाण अधिक असते आणि विटामिन ए हे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली राखण्यास मदत करते. त्यामुळे पेरूचे रोज नियमित सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात.
•वजन कमी करते
ज्या व्यक्तींना लठ्ठपणाचा त्रास आहे, किंवा ज्या व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा अधिक असते, आणि त्यांना आपले वजन नियंत्रित करायचे असेल तर त्यांनी नियमित पेरूचे सेवन करावे असे आहार तज्ञ सल्ला देतात. पेरूमध्ये विटामिन प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण हे इतर फळांच्या तुलनेत अधिक असते आणि हे घटक आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम कंट्रोल करण्यास मदत करतात. त्यामुळे वजन नियंत्रित राहते, म्हणून ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांना पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो.
Share your comments