आपण नेहमी एका गोष्टीवर चर्चा करत असतो ते म्हणजे शाकाहारी जेवण्यात काय होते. पण तुम्हाला माहिती आहे का शाकाहारी जेवणातून आपल्याला अनेक जीवनसत्त्वे मिळत असतात. यात भाजीपालाचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केला तर आपल्या आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरणार आहे. आता ऋतू चक्र फिरत असून आता हिवाळा ऋतू काही दिवसात सुरु होणार आहे. या ऋतू काय खावे याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
हिवाळा ऋतू सुरु झाला महिला वर्गाच्या डोक्यात अनेक वेगवेगळ्या भन्नाट रेसिपी घुमू लागतात. मग संपूर्ण हिवाळा ऋतू संपेपर्यंत ओल्या हरभऱ्याची चटणी, घावणं, पाल्याची भाजी असे वेगवेगळे प्रकार प्रत्येकाच्या स्वंयपाक घरात होऊ लागतात. या ओल्या हरभऱ्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. विशेष म्हणजे केवळ ओल्या हरभऱ्याचेच नव्हे, तर चणे किंवा हरभरा डाळीचं पीठ (चणा डाळीचं पीठ) हेदेखील शरीरासाठी बहुगुणी ठरत असल्याचे दिसून येते.
हरभरा खाण्याचे काय आहेत फायदे
- हरभऱ्यामध्ये मॉलिक अॅसिड, ऑक्झालिक अॅसिड यांचं प्रमाण असल्यामुळे आम वांत्या (उलटी), अपचन या समस्या दूर होतात.
- हरभरा स्नायूवर्धक आहे. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांनी हरभऱ्याचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरू शकते.
- ओल्या हरभराच्या पानांमध्ये लोहाचे पुरेपूर प्रमाण असते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी हरभऱ्याच्या पानांची भाजी खावी.
- कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असल्यास हरभरा डाळीचे पीठ प्रभावी जागेवर लावावे. डाळीच्या पीठाने रंग उजळतो.
- चेहऱ्यावर मुरुम असतील तर एक चमचा दही घेऊन त्यात थोडसे डाळीचे पीठ घालावे. त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.केस रुक्ष किंवा कोरडे असतील तर डाळीच्या पीठाने केस धुवावेत.
- सतत घाम येऊन शरीरातून दुर्गंधी येत असल्यास अंघोळ करताना डाळीच्या पीठाचा लेप लावावा.
हरभरा खाण्याचे अनेक फायदे होत असताना काही जणांना मात्र हरभरा हा जड पदार्थ आहे. हरभरा डाळ पचण्यास जड आहे. तसेच ती उष्ण, तुरड-गोड चवीची आहे. त्यामुळे वातदोष वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच, वातप्रकृतीच्या व्यक्तींनी हरभरा डाळ किंवा हरभऱ्याचे सेवन करु नये. हरभरा पचण्यास जड आहे. त्यामुळे पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी किंवा अपचनाचा त्रास होणाऱ्यांनी हरभऱ्याचं सेवन टाळावे. तसेच डाळीच्या पीठापासून केलेले पदार्थ देखील जास्त खाऊ नये.
Share your comments