1. आरोग्य

तुम्ही अंडे खाता का ? नाही , मग सुरू करा खाणं; चांगल्या आरोग्यासाठी आहे उपयुक्त

KJ Staff
KJ Staff


निरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे  आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत....

 शरीराला आवश्यक पोषण मूल्यांच्या खजाना

 शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक असणारे अनेक जीवनसत्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये अ, ब १२ व ब ५, ब २ ही ब वर्गातील जीवनसत्वे असतात. तसेच फास्फोरस, कॅल्शियम, ओमेगा तीन तू अशी इतर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराच्या फिटनेससाठी दररोज एक अंडे खाणे कधीही फायद्याचे असते.

 डोळ्यांसाठी आरोग्यदायी

लंडनमध्ये लुटीन आणि झिझेनथिन ही दोन एंटीऑक्सीडेंट मुबलक असतात. हे दोन्ही घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात. अंड्यातील पिवळा बलकामध्ये हे घटक समाविष्ट असल्याने बलक खाणे ही तितकेच गरजेचे असते. डोळ्यांच्या मोतीबिंदू आणि रेटिनाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हे दोन्ही एंटीऑक्सीडेंट आवश्यक असतात. त्यामुळे आहारात त्याचा समावेश अवश्य करावा.

 वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त

 अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अंडी खाल्ल्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. खंड्यांमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होऊ शकत नाही व ज्या आहेत त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहून वजन वाढण्याच्या समस्यांपासून मुक्तता होते.

प्रोटिन्स मिळवण्यासाठी उपयुक्त

 अंडे हा प्रोटीन मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यांमधून भरपूर प्रोटिन्स असा पुरवठा होत असल्याने स्नायू बळकट होतात व ऊतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते अंड्यामुळे पुरुषांची ११ टक्के तर यांची १४  टक्के प्रोटीनची गरज भागते. एका अंड्यापासून साधारणतः ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात.

 


अंड्यातील पिवळ्या बलकाचे महत्व

अंड्यातील पिवळ्या बलका मध्ये झिंक, लोह,, विटामिन ई, फास्फोरस व इतर प्रकारचे पोषक घटक भरपूर असतात. त्यामुळे अंडे खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा जास्त होतो.

   अंड्यामधील फॅटचे प्रमाण

 एका अंड्यामध्ये फक्त ५ ग्रॅम फॅट्स आणि जवळपास ८५ कॅलरीज असतात. तर कार्बोहायड्रेट्स नसतात. अंड्यामधील अमिनो ऍसिडची रचना मानवी शरीरातील अमिनो ऍसिड प्रमाणे असते. तसेच जिमला जाणाऱ्यांसाठी अंडी अतिशय उपयुक्त आहे कारण त्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघते आणि स्नायू बळकट होतात व शरीरातील ऊर्जा टिकून राहते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters