आजच्या घडीला निरोगी आरोग्य आणि तंदुरुस्त शरीर खूप मूल्यवान आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि पोषक आहार खूप गरजेचा असतो. बऱ्याच वेळा काही वाईट सवयी मुळे सुद्धा अनेक भल्या मोठ्या आजारांची लक्षणे दिसून येतात.
हाडे हा शरीरातील एक महत्वाचा घटक आहे. शरीरातील प्रत्येक अवयवात हाडे असतात त्यामुळे हाडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण काही उपाय केले पाहिजेत नियमित दुधाचे सेवन केल्यामुळे हाडामधील कॅल्शियम चे प्रमाण वाढते तसेच हाडे मजबूत आणि तंदुरुस्त राहतात. तसेच मटण मांस खाल्याने हाडे मजबूत बनण्यास सुरुवात होते. परंतु तुम्हाला माहितेय का आपल्याच काही सवयीमुळे आपली हाडे कमजोर होतात आणि त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते.
1) व्हिटॅमिन डी ची कमतरता:-
बऱ्याच लोकांना घराच्या बाहेर न निघण्याची सवय असते तसेच त्यांच्या शरीराला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते. त्यामुळं व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपली हाडे कमकुवत होतात यासाठी उपाय म्हणून दररोज सकाळी 30 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे.
2) एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे:-
एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्यामुळे हाडांच मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होते. हाडे निरोगी ठेवण्यासाठी त्यांची हालचाल होणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्त वेळ एकाच जागेवर बसणं टाळा. रोज नियमित व्यायाम करा.
3) मिठाचे अतिप्रमा:-
सोडिअम शरीरासाठी फार महत्वाचं असतं. मिठातून भरपूर प्रमाणात सोडिअम मिळते. परंतु मिठाचे जास्त प्रमाण धोकादायक ठरू शकते.सोडियम मुळे हाडे कमजोर आणि पोकळ होतात या साठी आहारात मिठाचा वापर कमी प्रमाणात करावा.
4)सॉफ्ट ड्रिंकचं सेवन:-
सॉफ्ट ड्रिंक पिणे अनेक लोकांना आवडत परंतु नियमित आणि जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक्स चे सेवन केल्यास दातांची मोठ्या प्रमाणात झीज होते आणि हाडे सुद्धा कमजोर होऊ लागतात म्हणून कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळावे.
Share your comments