बऱ्याच लोकांना किडनी स्टोन अर्थात मुतखड्याचा त्रास असतो. या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी बरेच जण हॉस्पिटलच्या चकरा मारतात. बरेच जण शस्त्रक्रिया करून हा त्रासापासून मुक्ती मिळवतात. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, मूत्रपिंड म्हणजेच किडनी हे एक शरीरातील महत्त्वाचा अवयव असून शरीरातील नकोसे घटक बाहेर टाकण्याच व शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम त्याच्या मार्फत केले जाते.
परंतु काही कारणामुळे मूत्रपिंडाचे संबंधित विकार उद्भवतात. त्यातीलच किडनी स्टोन हा आजार बऱ्याच जणांना आहे. बऱ्याच प्रमाणात समज आहे की बियर प्यायल्याने किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होते परंतु यामागील सत्य काय आहे याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:Health Information: बंधूंनो! जेवण झाल्यानंतर 'या' गोष्टी टाळा,नाहीतर होईल पश्चाताप
बियर पिल्याने मुतखड्याचा त्रास कमी होतो का?
ज्या लोकांना किडनी स्टोनचा अर्थात मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी बियर प्यायली तर काही प्रमाणात फायदा होतो परंतु यामुळे नुकसान होण्याचा देखील तितकाच धोका संभवतो.
एकंदरीत बियर चे स्वरूप पाहिले तर ती डाययूरेटीक स्वरुपात काम करते त्यामुळे युरीनच प्रमाण वाढतं. जास्त प्रमाणात बियर सेवन केले तर लघवीला वारंवार जावे लागते त्यामुळे मुतखड्याचे जे काही बारीक तुकडे असतात ते लघवीवाटे निघून जातात असं म्हटलं जातं परंतु जास्त प्रमाणात बियर जर पिले तर ते शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकतं.
किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीने बियर प्यायल्याने त्रासापासून मुक्ती तर सोडाच उलट जास्त त्रास होण्याचा संभव जास्त असतो व वेदना आणखी वाढू शकतात.
मुतखडा असलेल्या व्यक्तीच्या मूत्रमार्ग मध्ये एखादा खडा जेव्हा अडकून बसतो तेव्हा लघवी पास होणे अवघड जाते व वेदना आणखी वाढतात व त्रास होऊ शकतो त्यामुळे जास्त मद्यपान केले तर किडनी स्टोन चा आकार वाढण्याची संभावना जास्त असते.
नक्की वाचा:कॉलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात हे पदार्थ; चांगल्या तब्येतीसाठी आजपासूनच हे पदार्थ सोडाच
दुसरा दुष्परिणाम म्हणजे शरीरात हायऑक्सिलेटची पातळी बियर मुळे वाढते. यामुळेदेखील नवीन खडे तयार होऊ शकतात किंवा त्यांचा आकार देखील मोठा होऊ शकतो. मुतखडा दूर होणे तर सोडाच परंतु बियर पहिल्याने क्रोनिक किडनी डिसिज होण्याची दाट शक्यता असते.
जास्त प्रमाणात बियरचे सेवन केले तर शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मूत्रपिंडावर जास्त ताण पडतो. एवढेच नाही तर डीहायड्रेशन देखील होण्याची दाट शक्यता असते.
या सगळ्या गोष्टींमुळे शरीराच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर वाईट परिणाम होतो त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास कमी होईल या उद्देशाने जास्त प्रमाणात बियर पिणे हे कधीही घातक ठरू शकते.त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तमच ठरेल.
Share your comments