आपण सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम चहाचा घोट पीत असतो आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो. अनेक लोकांची दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट चहा पिऊन होत असते. मात्र असे असले तरी अधिक चहाचे सेवन मानवी शरीराला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आयुर्वेदिक चहा पिल्याने काय फायदा होऊ शकतो याविषयी सांगणार आहोत. मित्रांनो सकाळी सकाळी आपण तेजपत्ता टाकून हर्बल चहा प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात.
तेजपत्ता अर्थात तमालपत्राच्या औषधी गुणधर्मांमुळे तेजपत्ताचे सेवन मानवी शरीरासाठी फायदेशीर ठरत असते. यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी शरीराला अनेक रोगांशी लढण्यासाठी तयार करत असते. तेजपत्ता मध्ये प्रथिने, आहारातील फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी6 आणि फोलेट चांगल्या प्रमाणात आढळत असल्याचे सांगितले जाते. याव्यतिरिक्त तेजपत्त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखी खनिजे देखील मुबलक प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तेजपत्ता चहा मानवी आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतो, म्हणुन आज आपण तेजपत्ता चहाचे फायदे काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सर्दी-खोकला, फ्लू आणि दमासाठी रामबाण- तमालपत्रात अँटीव्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात त्यामुळे तेजपत्ता चहा सर्दी आणि इतर फ्लूसारख्या समस्यांपासून आराम देते. एवढेच नाही तर दम्यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास देखील तेजपत्ता चहा विशेष मदत करत असतो.
सांधेदुखीसाठी नंबर वन उपाय-तज्ञांच्या मते, तेजपत्तामध्ये कार्नोसिक ऍसिड आणि कार्नोसोल नावाचा घटक असतो, ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे की गॅमा रिसेप्टर सक्रिय करून जळजळ नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे तेज पत्ता चहा सकाळी सकाळी अनाशेपोटी पिल्याने सांधेदुखीपासून आराम मिळत असतो.
कॅन्सरसाठी देखील आहे रामबाण - तेजपत्तामध्ये क्लोरोजेनिक ऍसिड, कॅफीक ऍसिड, रोझमॅरिनिक ऍसिड आणि इलाजिक ऍसिड सारखे ऍसिड आढळतात, जे सर्व कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करत असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर हे घटक किंवा ऍसिड मेंदूचे कार्य सुधारण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत देखील मोठे उपयोगात येत असतात. तेजपत्ता चहाच्या या फायद्यांमुळे सकाळी-सकाळी रिकाम्यापोटी तेजपत्ता चहा पिण्याचा सल्ला दिला जात असतो.
Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.
Share your comments