भारतीय स्वयंपाक घरात अनेक प्रकारचे मसाले आपल्याला बघायला मिळतात. आपल्या किचनमध्ये नानाविध प्रकारचे मसाले असतात ज्याचा उपयोग करून आपण स्वयंपाक तयार करीत असतो. लवंग देखील अशाच एका मसाल्यापैकी एक आहे, लवंग स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी उपयोगाचा आहे याव्यतिरिक्त लवंग मध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्य सुदृढ बनवण्यास देखील उपयोगाचे ठरू शकतात.
मित्रांनो लवंगमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे याचा चहा पिणे देखील मानवी आरोग्याला अनेक फायदे देऊन जातात. लवंग मध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळत असतात याव्यतिरिक्त यामध्ये सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, फोलेट, नियासिन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फायबर, प्रथिने यांसारखे पोषक घटक देखील मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे याचा चहा पिणे आरोग्यास विशेष फायद्याचा असतो.
लवंगाचा चहा पिण्याचे फायदे- सर्दी-खोकला असल्यास रामबाण- सर्दीची तक्रार असल्यास लवंगाचा चहा पिला पाहिजे असा सल्ला दिला जातो. याचे सेवन विशेषता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठे फायद्याचे असते. याचे प्रमुख कारण म्हणजेच लवंगाचा प्रभाव अथवा स्वभाव उष्ण असतो, त्यामुळे लवंगाचा चहा प्यायल्याने शरीरात उबदारपणा येतो, एवढेच नाही यामुळे सर्दी खोकल्यासारख्या आजारातदेखील रामबाण ठरत असते.
पोटासाठी देखील आहे गुणकारी - लवंगमध्ये असलेले औषधी गुणधर्म पोटाच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विशेष फायदेशीर ठरत असते. त्यामुळे लवंगाचा चहा सेवन केल्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. यासोबतच अॅसिडिटीच्या तक्रारीपासूनही सुटका मिळते, त्यामुळे पोटाचे अनेक विकार दूर राहण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी विशेष फायद्याचे- लवंग मध्ये असणारे गुणधर्म मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असतात, कारण लवंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे जर आपण लवंगाचा चहा सेवन करत असाल तर आपण अनेक प्रकारच्या आजारांपासून बारा हात लांबच राहणार आहात.
Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.
Share your comments